Somaiya vs Mushrif: आता भाजपला लोकशाही मार्गानेच सरळ करणार 
कोल्हापूर

Somaiya vs Mushrif: आता भाजपला लोकशाही मार्गानेच सरळ करणार

आपण देखील भाजपा नेत्यांचे घोटाळे बाहेर काढले पाहिजेत. आता शांत बसून चालणार नाही, आपल्या सगळ्यांवर हे आरोप करतील, आता यांना लोकशाही मार्गाने सगळं करावं लागेल. पण विनाकारण आरोप करणं आणि बदनामी सहन करणार नाही

सरकारनामा ब्युरो

'मी १७ वर्षे मंत्री आहे, पण आजपर्यंत एकही घोटाळा केलेला नाही. तीन वर्षात मंत्रिपदाला २० वर्षे होतील. आता मी देखील महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांना सांगितलं आहे, की आपण देखील भाजपा नेत्यांचे घोटाळे बाहेर काढले पाहिजेत. आता शांत बसून चालणार नाही, आपल्या सगळ्यांवर हे आरोप करतील, आता यांना लोकशाही मार्गाने सगळं करावं लागेल. पण विनाकारण आरोप करणं आणि बदनामी सहन करणार नाही,'' अशा स्पष्ट शब्दांत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना खडसावले आहे म्हटले आहे.

किरीट सोमय्या यांनी केलेले सर्व आरोप पत्रकार परिषदेत मुश्रीफांनी फेटाळून लावले आहेत. तसेच, सोमय्यांनी आज सकाळी केलेल्या आरोपांवर माफी मागावी, न्यथा त्यांच्यावर ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार, असा इशाराही मंत्री मुश्रीफ यांनी दिला आहे.

कंपनीला तोटा झाल्याने आप्पासाहेब नलावडे कारखाना ब्रिक्स इंडिया कंपनीने मुदतीच्या दोन वर्षापूर्वी सोडला. सोमय्यांनी नितीन गडकरींचं मार्गदर्शन घेतलं असतं तर बरं झालं असते. नलावडे कारख्यान्याशी माझा कोणताही वैयक्तिक संबंध नाही. २ वर्षापुर्वीच कारखाना संचालक मंडळाला सुपुर्द केला. आमदार म्हणून कारखान्यांना सहकार्य करत असतो. एकदा मीच सोमय्यांना बोलवून कारखाना पर्यटन करवतो, असे मुश्रीफांनी म्हटले आहे. मात्र किरीट सोमय्या करत असलेल्या आरोपांच्या मागे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा हात असल्याचा आरोपही यावेळी हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

मी पत्रक काढून सोमय्यांना कारखाना पाहणयासाठी आमंत्रण दिलं आहे. या आणि कारखाना बघा, लोकांशी बोलल्यावर तुम्हाला हसन मुश्रीफ कळेल. किरीट सोमय्यांनी पुर्ण माहिती घेऊन आरोप करावेत, दहा वर्षांपुर्वीच कारखान्यांचे कर्ज फेडले आहे. सोमय्या स्वत: सांगतात, मी फडणवीसांकडे कागदपत्र घेऊन जातो आणि त्यानंतर फडणवीस सांगतात त्यांचा घोटाळा बाहेर काढतो. सोमय्यांनी सत्य सांगाव आम्ही स्वागत करु, मात्र बेछुट आरोप सहन करणार नाही. सोमय्यांना रोखण्याचा कलेक्टर, जिल्हा प्रशासन पातळीवर घेण्यात आला. यात माझा कोणताही संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT