Threat to Jawali Leadr Saurabh Shinde
Threat to Jawali Leadr Saurabh Shinde 
कोल्हापूर

जावळीचे उपसभापती सौरभ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी

सरकारनामा ब्युरो

सातारा : जावळी पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती सौरभ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी कुडाळ दूरक्षेत्रात दोघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. 

किसनवीर कारखान्याचे संचालक चंद्रसेन शिंदे व कुडाळचे सरपंच विरेंद्र शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. कुडाळ येथे अपुलकी पेट्रोल पंपासमोर उप सभापती सौरभ शिंदे यांची जमीन आहे. यातील एक प्लॉट त्यांनी रामचंद्र पवार (रा. शेते, ता. जावळी) यांना विकला आहे. त्या प्लॉटमध्ये किसनवीर कारखान्याची ऊसतोडणी करणारी टोळी वास्तव्यास आहे. 

ही टोळी त्याठिकाणीवास्तव्यास असल्याने बाकीचे प्लॉट विक्री करताना अडचण येत असल्याने ती टोळी हटवण्याबाबत सौरभ शिंदे यांनी पवार यांना विनंती केली होती. त्यानंतर ती टोळी हटविण्याच्या कारणावरून शुक्रवारी वाद झाला. यावेळी सौरभ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT