Dhairyasheel Mane
Dhairyasheel Mane  Sarkarnama
कोल्हापूर

Kolhapur News : कोल्हापुरात राजकारण पेटलं; ठाकरे-शिंदे गट भिडले, खासदार मानेंची गाडी अडवली अन्...

सरकारनामा ब्यूरो

Thackeray Vs Shinde News : ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी नुकताच कोल्हापूर दौरा केला होता. यावेळी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख शहरात सभा घेतल्या. यात राऊतांनी ठाकरे गटातून फुटलेल्या दोन खासदार आणि आमदारांचा चांगलाच समाचार घेतला होता. तसेच धैर्यशील माने यांच्यावरही जोरदार टीका केली होती.

गद्दार खासदार म्हणत त्यांनी इचलकरंजी येथे माने यांना थेट आव्हान दिले होते. यानंतर ठाकरे गट पुन्हा आक्रमक झाला आहे. कोल्हापुरात शिंदे गट व ठाकरे गट भिडले असून खासदार धैर्यशील माने यांची गाडी देखील अडवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी शहरालगत असलेल्या चंदूर या गावात घडला. खासदार माने चंदूर येथे एका कार्यक्रमासाठी जात होते. यावेळी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आक्रमक होत शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने(Dhairyasheel Mane) यांची गाडी अडवली. यावेळी शिवसैनिकांनी आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी करत तुम्ही का गद्दारी केली. याचा थेट जाब विचारला. यावेळी ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरी तुमरी झाली.

नेमकं काय घडलं?

शिंदे गट आणि ठाकरे गटात आमने सामने आल्यानंतर चंदूर गावात काहीवेळ चांगलाच तणाव निर्माण झाला. पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी दो्न्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला केले. वेळीच पोलिसांनी मध्यस्थी केल्यानं परिस्थिती नियंत्रणात आली.

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला करत शांत केल्यानंतर खासदार धैर्यशील माने यांची गाडी मार्गस्थ झाली. माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यापासून ठाकरे गट चांगलाच संतप्त झाला आहे. यातूनच हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.

खोकेपटूंमधील हाही मोठा खेळाडू...

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी धैर्यशील मानेंनी 'मीच खासदार' टॅगलाईन बदलून आता 'मीच गद्दार' करावी असा हल्लाबोल केला होता. यावेळी त्यांनी यांचे नाव धैर्यशील कोणी ठेवले? यांना कोठेच धैर्य नसतो. कदाचित त्यांना भाजपही तिकीट देणार नाही. खोकेपटूंमधील हाही मोठा खेळाडू आहे असे खात्रीलायकरित्या माहिती आहे. तसेच जनभावना बघता त्यांना बाहेरही फिरता येणार नाही अशा गद्दारांना तुम्हीच योग्य तो धडा शिकवा असंही राऊत म्हणाले होते

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT