vikram nagar area development issues will solve rahul awade says suresh halvankar 
कोल्हापूर

Ichalkaranji Assembly Election 2024 : क - १ चा शेरा पुसण्याचे काम राहुल आवाडे करतील - सुरेश हाळवणकर

‘विक्रमनगर परिसराला भेडसावणारा आणि अडचणीचा ठरत असलेला क - १ चा शेरा कायमचा पुसण्याचे काम भाजपचे उमेदवार राहुल आवाडे निश्‍चितपणे करतील’, असे अभिवचन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिले.

सरकारनामा ब्यूरो

इचलकरंजी : ‘विक्रमनगर परिसराला भेडसावणारा आणि अडचणीचा ठरत असलेला क - १ चा शेरा कायमचा पुसण्याचे काम भाजपचे उमेदवार राहुल आवाडे निश्‍चितपणे करतील’, असे अभिवचन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिले.

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीतील भाजपचे अधिकृत उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ महेश भवन येथे प्रभाग क्रमांक १३, १४ आणि १५ मधील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांच्या आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते.

हाळवणकर म्हणाले, ‘विक्रमनगर परिसरात १९७१ पासून टाऊन प्लॅनिंगचा शेरा लागला आहे. त्यामुळे येथील नगारिकांना जागेची खरेदी-विक्री करण्याबरोबरच घराच्या बांधकामासाठी कर्ज काढतानाही अनंत अडचणी येत आहेत.

हा क -१ चा शेरा कायमस्वरूपी काढण्यासाठी आम्ही ताकदीने प्रयत्न करू. त्याचबरोबर काही मिळकतींना शास्ती लागली असून, ही शास्ती रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामध्ये असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करून त्याची लवकरच प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करण्यात येईल.’

आमदार शशिकला जोल्ले म्हणाल्या, ‘नरेंद्र मोदी यांचे वसुधैव कुटुंबकमचे तत्त्व सरकारने जपले आहे. मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचा फायदा सर्व कुटुंबाने घ्यावा.’

राहुल आवाडे यांनी आपल्या भाषणात इचलकरंजी शहरातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले कामे मार्गी लावण्यासाठी आपल्याला साथ देण्याचे आवाहन केले. यावेळी अशोक स्वामी, अमृत भोसले, हेमलता आरगे, निर्मला आरगे, मिश्रीलाल जाजू,

सुनील पाटील, दीपक पाटील, वृषभ जैन, आबा बनसोडे, इम्रान मकानदार, राजाराम बोंगार्डे, आनंदराव नेमिष्टे, अमित जावळे, संगिता साळुंखे, सुप्रिया संकपाळ, सचिन माच्छरे, सुनील साळुखे, संजय गेजगे, नरसिंह पारीक, प्रवीण खामकर, प्रदीप मळगे, श्रीरंग खवरे, रेखा मोरबाळे, सुखदेव माळकरी, अभय बाबेल, इंद्रजित लोया, विठ्ठल शिंदे आदींसह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT