Sambhajiraje Chhatrapati, Sharad Pawar
Sambhajiraje Chhatrapati, Sharad Pawar sarkarnama
कोल्हापूर

संभाजीराजेंचे काय करायचं; शरद पवारांनी टाकली गुगली...

Umesh Bambare-Patil

कोल्हापूर : महाराष्ट्राचे काही प्रश्न राज्यसभेत येतात तेव्हा महाराष्ट्रातील सदस्य पक्षिय मतभेद बाजूला ठेऊन एकत्र येऊन भूमिका घेतात. अशावेळी संभाजीराजेंचे सहकार्य आम्हाला नेहमी मिळते. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत आलेला असताना त्यांना पाठींबा देण्याविषयीचा निर्णय हा एका पक्षाचा नसून आम्हाला काँग्रेस, शिवसेनेला विचारावे लागेल. याविषयी आम्ही एकत्रित निर्णय घेऊ, असे स्पष्ट मत खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.

खासदार शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपत आला आहे. त्यांच्याविषयी काय निर्णय घेणार असे विचारले असता ते म्हणाले, मीदेखील राज्यसभेत त्यांचा सहकारी आहे. ज्यावेळी महाराष्ट्राचे काही प्रश्न राज्यसभेत येतात तेव्हा महाराष्ट्रातील सदस्यांना बोलावून पक्षीय मतभेद बाजूला ठेवून राज्यासाठी एकत्र येण्याची भूमिका आम्ही घेतो.

अशा कामांमध्ये संभाजीराजेंचे सहकार्य आम्हाला नेहमी मिळाले आहे. पण, त्यांचा कार्यकाळ संपत असताना त्यांना पुन्हा पाठिंबा देण्याविषयीचा निर्णय केवळ एका पक्षाचा नाही. त्यासाठी आम्हाला काँग्रेस आणि शिवसेनेला विचारावे लागेल. त्यामुळे शक्यतो एकत्रित निर्णय घेऊ असेही शरद पवार यांनी सांगितले. राज्यात आतापर्यंत अनेक चळवळी झाल्या. फरक एवढाच जाणवतो की, कोल्हापूर हा जिल्हा चळवळीचे महत्त्वाचे केंद्र असायचे.

त्या चळवळी लोकांच्या प्रश्नांसाठी असत. त्या चळवळी हनुमान चालिसा किंवा प्रार्थना अशा गोष्टींसाठी होत नव्हत्या. सामान्य लोकांसमोर असलेले महागाई, बेरोजगारी, कायदा व सुव्यवस्था असे सर्व प्रश्न बाजूला राहिले आहेत. आणि अयोध्येत काय झाले, हनुमान चालिसा म्हणणे हे प्रश्न पुढे आले आहेत. याचा अर्थ स्वच्छ आहे ज्यांच्या हातात देशाची सूत्रे आहेत त्या लोकांना मूलभूत प्रश्न सोडवता येत नाहीत. त्यात त्यांना अपयश आलेले आहे. म्हणून यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी या सगळ्या धर्मांध विचाराला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली जात आहे. त्याचे हे परिणाम आहेत असा खोचक टोलाही शरद पवार यांनी यावेळी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT