why state shikhar bank in profit hasan mushrif question
why state shikhar bank in profit hasan mushrif question 
कोल्हापूर

मग राज्य बॅंक फायद्यात कशी ? हसन मुश्रीफ यांचा सवाल

सरकारनामा ब्युरो

म्हाकवे (ता. कागल) :  पंजाब नॅशनल बॅंकेचे तब्बल एकवीस हजार कोटी येऊन निरव मोदी भारतातून बाहेर पळाला. स्टेट बॅंके पाठोपाठ देशातील मोठी बॅंक असा लौकिक व देशभर शाखा असलेली ही बॅंक अद्यापहि फायद्यात नाही. मग जर 25 हजार कोटींचा घोटाळा झाला असता तर राज्य बॅंक गेली पाच वर्षे फायद्यात कशी आली असती ? असा सवाल आमदार हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केला. 

म्हाकवे (ता. कागल) येथील एका कार्यक्रमात बोलताना श्री. मुश्रीफ यांनी राज्य बॅंकेवरील कारवाईबाबत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले," महाराष्ट्र राज्य ही सहकार पंढरी आहे. सहकारातील साखर कारखाने , सूतगिरण्या, बॅंका आणि छोट्या-मोठ्या संस्थांवर हजारो जणांचे संसार अवलंबून आहेत . अशा संस्थांना राज्य बॅंकेने त्यांच्या अडचणीच्या काळात कर्जे दिली. हा काय गुन्हा झाला काय ? 

ते म्हणाले,"उच्च न्यायालयाने दोनच दिवसापूर्वी राज्य बॅंके प्रश्न दिलेल्या निकालाचा आम्ही आदरच करतो. गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या घोटाळ्याची चर्चा राज्यभर सुरू आहे . त्यामध्ये विनाकारण माझ्या नावाची चर्चा सुरू आहे. कार्यकर्त्यांमध्ये आणि सहकार क्षेत्रामध्ये झालेली संभ्रमावस्था दूर करण्यासाठीच हा खुलासा करीत आहे. 

मुश्रीफ म्हणाले,"तशी कोणतीही परिस्थिती नव्हती. राज्य सहकारी बॅंकेने केलेल्या कर्ज पुरवठ्याबाबत माझ्याकडे पुरावे नाहीत. पण माझ्याकडे खात्रीशीर माहिती आहे, की या बॅंकेने केलेल्या कर्जपुरवठा पैकी 90 टक्के कर्जांची वसुली झाली आहे. 

उर्वरित दहा टक्के थकहमीची होणारी एक हजार कोटींची रक्कम राज्य सरकारने बॅंकेला देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार राज्य सरकार बॅंकेला एक हजार रुपये देणार असल्याचीही माझी माहिती आहे. बॅंकेच्या वतीने चुकीचे कर्जवाटप झाले असेल तर त्याच्या वसुलीसाठी कायदेशीर मार्ग आहेत.' 

संचालकांनी पैसे घरी नेले काय ? 
या बॅंकेत 25 हजार कोटींचा घोटाळा झालाय अशा प्रकारचं वातावरण झाल्यामुळे या बॅंकेचे संचालक हे पैसे घराकडे घेऊन गेलेत की काय असा एक संभ्रम झालाय. परंतु वस्तुस्थिती तशी नाही. ही रक्कम कर्ज वाटप झालेली आहे .त्यामुळे संचालकांचा त्यामध्ये काहीच संबंध नाही . कर्जाच्या थकीत रक्कमेपोटी काही संस्थांवर मालमत्ता विक्रीची कारवाई झालेली आहे, असेही ते म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT