Manoj Jarange sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या नावे 100 कोटी रुपये घेतले! मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

Maratha reservation Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले. सहा दिवस त्यांनी उपोषण केले.

Roshan More

Maratha Reservation : मराठा आंदोलनाच्या नावाखाली काही जणांनी 100 कोटी रुपये उकळल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. माझं नाव सांगून पैसे घेतले असतील तर त्यांच्या नावाची यादी माझ्याकडे द्या, असे आवाहन देखील जरांगे पाटील यांनी केले आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, काही जणांनी नाव मला कळली आहेत. या आंदोलनाचा फायदा घेत माझं नाव सांगून कोणी कामं घेतली असतील तर त्याची यादी मला द्या.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या Maratha Reservation मागणीसाठी आंदोलन केले. सहा दिवस त्यांनी उपोषण केले. मंत्री शंभूराज देसाई यांनी एक महिन्यात सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले आहे.

...विधानसभा निवडणूक लढणार

मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांची एक महिन्याची मुदत 13 जुलैला संपत आहे. या मुदतीमध्ये मराठा आरक्षण तसेच सगेसोयऱ्याची अंमलबजावणी केली नाही तर विधासभेतील 288 जागांवर उमेदवार उभे करणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT