Eknath Shinde And MVA sarkarnama
महाराष्ट्र

Eknath Shinde : राज-उद्धव एकत्र येण्याच्या चर्चेत, एकनाथ शिंदेंनी डाव साधला; एकाच वेळी नवी मुंबईतील डझनभर नगरसेवक फोडले

Navi Mumbai MVA News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधीच राज्यातील राजकारण तापत चाललं आहे. काँग्रेसला पुण्यात मोठा धक्का बसला असताना नवी मुंबईतदेखील काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाने राम राम ठोकला आहे.

Aslam Shanedivan

Mumbai News : मागील अनेक दिवसापासून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसला राज्यात गळती लागली आहे. ती अद्याप थांबलेली नाही. दरम्यान मुंबई महानगरपालिकेवर आपली पकड ठेवण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना वेग आला असतानाच एकनाथ शिंदे यांनी मात्र उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीला नवी मुंबईत मोठं खिंडार पडलं आहे. ठाकरे गट, शरद पवार गटासह काँग्रेसच्या जवळपास डझनभर माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सध्या मुंबईत खळबळ उडाली आहे.

राज्याच्या राजकारणात सध्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना सूसाट असून अनेक नेत्यांसह आजी - माजी नगरसेवकही प्रवेश करत आहेत. काहीच दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या प्रवक्ते संजना घाडी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटात प्रवेश केला होता. या ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात असतानाच आता आणखी मोठा पक्ष प्रवेश होणार आहे. मंगळवारी (ता.22) वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात शिंदे यांच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा आयोजित आहे. याच मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जवळजवळ 13 माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार आहे. यावेळी आगामी पालिका निवडणुकीच्या आधी मविआला खिंडार पडले असून शिंदे गटाची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

नवी मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सोमनाथ वास्कर (शहर संघटक) व माजी नगरसेविका पत्नी कोमल वास्कर, महानगरप्रमुख रतन मांडवे व माजी नगरसेविका पत्नी सुनिता मांडवे, शहरप्रमुख काशिनाथ पवार, माजी नगरसेवक रंगनाथ औटी आणि भारती कोळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेणार आहेत.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक वैभव गायकवाड पत्नी दिव्या गायकवाड यांच्यासह काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अविनाथ लाड, माजी नगरसेवक अंकुश सोनावणे माजी नगरसेविका हेमांगी सोनावणे आणि राजू शिंदे ही शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सध्या या प्रवेशाचे फलक शहरभर लागले असून नवी मुंबईत राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

अडचणींचा सामना

दरमयान नवी मुंबईत महाविकास आघाडीला (मविआ) मोठा धक्का बसला असून ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. जवळपास 12-13 माजी नगरसेवक महत्वाचे पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मविआला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तर या पक्षांतरामुळे नवी मुंबईतील राजकीय समीकरणेही बदण्याची शक्यता आता वर्तवली जातेय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT