Jay Pawar shares an emotional note remembering Ajit dada 15 days after his demise Sarkarnama
महाराष्ट्र

Jay Pawar Emotional Post : अजितदादांच्या निधनाला 15 दिवस; जय पवार भावूक, पोस्ट शेअर करत सांगितली मनातली 'ती' गोष्ट

Jay Pawar Instagram post Ajit dada: अजितदादांच्या निधनानंतर 15 दिवसांनी जय पवार यांनी भावनिक पोस्ट शेअर करत मनातील भावना व्यक्त केल्या. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Rashmi Mane

Impact of Ajit Pawar's demise on his son Jay Pawar: अजितदादांच्या निधनाला आज 15 दिवस पूर्ण झाले असून संपूर्ण राज्यात अजूनही शोककळा कायम आहे. 28 जानेवारी रोजी झालेल्या भीषण विमान अपघातात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सभा घेण्यासाठी ते मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. या अपघाताच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र अजूनही सुन्न झाला आहे. बारामतीत शोककळा पसरली होती. पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, वडिलांच्या निधनानंतर जय पवार सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. आज निधनाला 15 दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जय पवार यांनी पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर केली. त्यांनी अजित पवारांचा हसरा फोटो पोस्ट करत आपल्या मनातील भावना शब्दबद्ध केल्या. “तुमची रोज आठवण येते. तुम्ही दिलेले संस्कार आणि शिकवण माझ्या प्रत्येक पावलात आहेत – ते कधीही कमी पडू देणार नाही. Miss You Dad,” अशा शब्दांत त्यांनी वडिलांविषयीची ओढ व्यक्त केली.

Jay Pawar shares an emotional note remembering Ajitdada 15 days after his demise.

याआधीही जय पवार यांनी 3 फेब्रुवारी रोजी काही खास क्षणांचे फोटो शेअर केले होते. त्या पोस्टमध्ये “Missing you a lot Dad” असे लिहीत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. एका फोटोमध्ये त्यांनी वडिलांना घट्ट मिठी मारलेली दिसत होती, तर अजित पवार हसतमुखाने उभे असल्याचे पाहायला मिळाले. “Dad, काश वेळ थांबली असती… मी तुम्हाला घट्ट मिठीत घेऊन आयुष्यभर तसाच राहिलो असतो,” अशा ओळींनी अनेकांना भावूक केले होते.

अजित पवार यांच्या अचानक जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कामाची पद्धत, निर्णयक्षमता आणि कार्यकर्त्यांशी असलेला जवळचा संबंध यामुळे त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती. आज त्यांच्या आठवणी आणि त्यांनी दिलेले संस्कार हेच कुटुंबीय आणि समर्थकांसाठी आधार ठरत आहेत. जय पवार यांच्या भावनिक पोस्टमधून वडिलांशी असलेली त्यांची घट्ट नाळ पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT