Pakistani Nationals in Maharashtra: पहलगाम आंतकवादी हल्ल्यानंतर भारताने 48 तासात पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानंतर अटारी-वाघा सीमेवर पाकिस्तानी नागिरकांची गर्दी दिसून येत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात दीर्घकालीन व्हिसावर तब्बल 17 ते 18 पाकिस्तानी नागरिक राहत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी सात ते आठ हजार हे एकट्या मुंबईत राहत असल्याचे देखील सांगितले जात आहे. पर्यटक व्हिसावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांची संख्या देखील अधिक आहे.
पुण्यात 100 पाकिस्तानी व्हिसावर आले आहेत. त्यातील 20 जण टुरिस्ट तर 80 जण दिर्घकाली व्हिसावर आल्याचे एका मराठी वृत्तपत्राने आपल्या वृत्तात म्हटले आहे. संभाजीनगर जिल्ह्यात देखील 57 जण हे दिर्घकालीन व्हिसावर वास्तव्यास आहेत. अनेक जण लग्नानंतर येथे दिर्घकाळापासून वास्तव्यास आहे.
कॅबिनेट सुरक्षा समितीने घेतलेल्या निर्णयानुसार पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत देश सोडणयाचे निर्देश दिले होते. त्यानंतर व्हिस रद्द केले जाणार होते. निर्णयाला 48 तास उलटले आहेत. त्यामुळे व्हिसा रद्द होण्याची प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. वैध व्हिसा 27 एप्रिलपासून बंद करण्यात आले आहेत. तर पाकिस्तानी नागरिकांना वैद्यकीय कारणाने दिलेले व्हिसा 29 एप्रिलपर्यंतच वैध असतील.
पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे निर्देश दिले असताना पराराष्ट्र मंत्रालयाने नवीन प्रसिद्धीपत्रक काढले आहे. त्यामध्ये पाकिस्तानी हिंदू जे दिर्घकालीन व्हिसावर भारतात आले आहेत त्यांना 48 तासांत देश सोडण्याचे निर्देश लागू होणार नाहीत. ते भारतात थांबू शकतात.
गुरुवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीत सरकारचे जे पाऊल उचलेल त्याला विरोधी पक्षांचा पाठींबा असेल, असे सांगण्यात आले. काँग्रेसचे अध्यक्ष म्हणाले सरकारच्या प्रत्येक कृतीला आमचे समर्थन असेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.