मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा आजचा सहावा दिवस असून तो मिटण्याची अद्याप कोणतीही चिन्ह दिसून येत नाही. हा संप मिटवण्यासाठी कर्मचाऱ्यांना सरकारकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे. मात्र विलीनीकरणाची मागणी मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याची भूमिका कर्मचाऱ्याऱ्यांनी 'सरकारनामा'शी बोलताना मांडली आहे. परिणामी सरकारकडून होत असलेल्या कारवाईला देखील कर्मचाऱ्यांना सामोरं जाव लागतं आहे.
महामंडळाकडून राज्यभरातील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जात असून आता आणखी २८ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील २८ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता निलंबित कर्मचाऱ्यांची एकूण संख्या आता २०५३ इतकी झाली आहे. तसेच न्यायालय आणि सरकारच्या आदेशानंतरही संपात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता कठोर कारवाई करण्याचे आदेश एसटी महामंडळाने विभागीय नियंत्रकांना दिले आहेत. सोबतच 'नो वर्क नो पे' नियमाप्रमाणे कर्मचाऱ्यांचा पगारही थांबवण्यात आला आहे.
न्यायालयाच अवमान याचिका :
१ नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयाने हा संप बेकायदेशीर ठरवून कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्यानंतरही कर्मचारी कामावर न परतल्याने एसटी महामंडळाने न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याप्रकरणी अवमान याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने शुक्रवार पर्यंत या याचिकेवर म्हणणं मांडण्याचे आदेश कृती समितीला दिले होते. त्यानंतर आज या याचिकेवर न्यायालयात सुनावणी होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.