shivsena sarkarnama
महाराष्ट्र

राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले शिवसेनेतील मोठे नाव अडचणीत; बलात्काराचा गुन्हा दाखल

Shivsena | Deputy leader | Raghunath Kuchik : पुण्यात आणि गोव्यात नेवून बलात्कार केल्याचा आरोप

सरकारनामा ब्युरो

पुणे : राज्य शासनाचा राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले आणि शिवसेनेतील मोठे नाव अडचणीत आले आहे. शासनाच्या किमान वेतन मंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे उपनेते आणि रघुनाथ कुचिक यांच्यावर पुण्यात बलात्काचा गुन्हा दाखल झाला आहे. २४ वर्षीय तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून वारंवार शारिरिक संबंध ठेवल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी देऊन गर्भपात करायला लावला असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत.

Raghunath Kuchik

याबाबत अधिक माहिती अशी की, रघुनाथ कुचिक यांच्यावर पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या २ वर्षापासून २४ वर्षीय तरुणीला लग्नाचे अमिष दाखवत पुण्यात आणि गोव्यात नेवून शरीरसंबंध ठेवले. तसेच संबंधित तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देऊन गर्भपात करायला लावला असे आरोप कुचिक यांच्यावर करण्यात आले आहेत. याबाबत कुचिक यांनी अजून त्यांचे म्हणणं माध्यमांसमोर मांडलेले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT