Sarkarnama Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update : नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्या पत्नीचे निधन

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 25 April महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) प्रशासकीय, आर्थिक, शैक्षणिक तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

सरकारनामा ब्यूरो

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाशिक दौरा रद्द

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाशिकमधील नियोजित दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भातील महत्त्वाची बैठक तसेच पुरोहित संघासोबतची बैठकही रद्द करण्यात आली आहे.

आमदार राहुल ढिकले यांच्या पत्नीचे निधन 

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार राहुल ढिकले यांच्या पत्नी सौ. आदिती राहुल ढिकले यांचे निधन झाले आहे. ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची प्राथमिक माहिती असून नाशिक दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंत्यदर्शनासाठी जाणार.

Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महंत हरिगिरीजी महाराज (जुना आखाडा), महंत रविंद्रपुरीजी महाराज (निरंजनी आखाडा), महंत शंकरानंद (आनंद आखाडा), महंत गिरिजानंद, महंत रामकृष्ण लहवितकर, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार हिरामण खोसकर, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यासह मंदिर देवस्थानचे विश्वस्त उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दर्शन घेऊन पूजा केली. मंदिर देवस्थानच्या वतीने मुख्याधिकारी योगेश जाधव, कैलास घुले, मनोज थेटे यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचा सत्कार केला.

Uddhav Thackeray : उद्वव ठाकरेंसोबतच्या भेटीच्या चर्चेबाबत देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

राज्यात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कथित भेटीच्या चर्चेने राजकीय चर्चाना उधाण आलं आहे. या कथित भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आम्हाला लपून छपून भेटायची गरज नसल्याचे म्हणत भेटीचे वृत्त फेटाळून लावलं. तर कथित भेटीची बातमी देणाऱ्या वृत्तसंस्थेला नोटीस पाठवणार असल्याचेही स्पष्ट केले.

AAP Rajya Sabha MP : भाजपमध्ये गेलेले आपचे सर्व खासदार अपात्र होणार? आपचे राज्यसभा प्रतोदांची तक्रार दाखल

अरविंद केजरीवाल यांच्या आम आमदी पक्षाला पंजाबमध्ये मोठा धक्का बसला आहे. आपच्या राज्यसभेच्या 10 पैकी 7 खासदारांनी भाजपचं कमळ हाती घेतल्यानं मोठी खळबळ उडाली. आपची साथ सोडतानाच राज्यसभेत आम आदमी पक्षाचे भाजपात विलीनीकरण करण्यात आलं आहे. तशी प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. परंतु आपने याला नियमांचे उल्लंघन म्हटले आहे. 'आप'चे राज्यसभा प्रतोद एन. डी. गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, ते राघव चड्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्या विरोधात राज्यसभा अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांना पत्र सादर करणार आहेत. या तिन्ही नेत्यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे 'आप'चे राज्यसभा प्रतोद या तिन्ही खासदारांविरुद्ध तक्रार दाखल करतील. हरभजन सिंग, स्वाती मालीवाल, विक्रम साहनी आणि राजिंदर गुप्ता यांनी अद्याप भाजपमध्ये सामील झाल्याचे जाहीर केलेले नाही.

RBI News : भारताच्या परकीय चलन साठ्यात मोठी वाढ; Reserve Bank of Indiaची माहिती

भारताच्या परकीय चलन साठ्यात मोठी वाढ झाल्याची माहिती Reserve Bank of India ने जाहीर केली आहे. 17 एप्रिलला संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा 2.3 अब्ज डॉलर्सने वाढून 703 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाला आहे.

परकीय चलन मालमत्ता : 1.48 अब्ज डॉलर्सने वाढून 557 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त

सोन्याचा साठा : 790 दशलक्ष डॉलर्सने वाढून 122 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त

SDR (Special Drawing Rights) : 18.84 अब्ज डॉलर्स

IMF मध्ये भारताची स्थिती : 4.87 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढ

Sandeep Deshpande MNS : 'आम्हाला बघायचं आहे, मुंबई बंद करण्याची ताकद भैय्यांमध्ये आहे का?'

राज्यात 1 मे रोजी पासून म्हणजेच, महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात येणार आहे. यावरून वाद पेटला आहे. मनसे यावर आक्रमक असून, या निर्णयाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, यासाठी मैदानात उतरली आहे. "आम्हाला बघायचं आहे, मुंबई बंद करण्याची ताकद भैय्यांमध्ये आहे का? मराठी बऱ्याच लोकांना येते, शशांक राव यांना प्राॅब्लेम काय आहे. अटक वगैरे आम्हालाच करतात, मात्र निरुपम वगैरे यांना सूट दिली आहे. कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे. दिघे साहेब असते तर निरुपम यांच्या कानाखाली मारली असती. तेच एकनाथ शिंदे यांनी करावं ही अपेक्षा आहे," असा घणाघात संदीप देशपांडे यांनी केला आहे.

Kunal Gaikwad Buldhana : आमदार संजय गायकवाड पुत्राचा व्हिडिओ व्हायरल, विरोधकांना अपशब्दावरून संताप

आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाड हा कारच्या बोनेटवर उभं राहून विरोधकांना अश्लील शिवीगाळ करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नगरपरिषद निवडणुकीदरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र पुन्हा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने जिल्ह्यात नेटकऱ्यांमध्ये चांगलाच संताप कमेंटच्या माध्यमातून निघत आहे. कुणाल गायकवाड हा बुलढाणा नगरपरिषदेचा सदस्य असून नगर परिषदेतील गटनेता सुद्धा आहे.

Paytm Payments Bank licence news : RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द...

भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेवर कठोर कारवाई करत त्यांचा बँकिंग परवाना तात्काळ प्रभावाने रद्द केला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 अंतर्गत हा परवाना रद्द करण्यात आला असून, आता ही बँक भारतात बँकिंग व्यवहार करण्यास पात्र राहणार नाही. आरबीआयने आपल्या आदेशात या कारवाईमागील स्पष्ट कारणे नमूद केली आहेत. बँकेचे कामकाज आणि व्यवस्थापन हे ठेवीदारांच्या हितासाठी नुकसानकारक असल्याचे आरबीआयला आढळून आले. पेमेंट बँक परवान्यासाठी आवश्यक असलेल्या अटींचे पालन करण्यात बँक वारंवार अपयशी ठरली.

Farmer News : 'देशभरात गरजेनुसार खतांचा पुरवठा सुरळीत, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा खतांचा साठा'

देशात खतांच्या तुटवड्याबाबत सुरू असलेल्या वादात काँग्रेसचे अध्यक्ष Mallikarjun Kharge यांनी केलेला दावा केंद्रीय रसायन आणि खत मंत्री J. P. Nadda यांनी फेटाळून लावला आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असून देशभरातील गरजेनुसार खतांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं नड्डा यांनी स्पष्ट केलं. खर्गे यांचं वक्तव्य राजकीय हेतूनं प्रेरित असून ते शेतकरी आणि उत्पादकांची दिशाभूल करणारं असल्याची टीका त्यांनी केली. तसंच, अस्तित्वात नसलेली भीती निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचं सांगत, जागतिक किमतींमधील चढ-उतारांपासून भारतीय शेतकऱ्यांना सरकारनं संरक्षण दिलं असल्याचा दावा त्यांनी केला. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा खतांचा साठा अधिक असल्याचंही त्यांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं.

Karnataka Reservation : राज्यातील अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे अंतर्गत वर्गीकरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय

कर्नाटक सरकारने राज्यातील अनुसूचित जातीच्या (SC) 15% आरक्षणाचे अंतर्गत वर्गीकरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष मंत्रिमंडळ बैठकीत या नव्या फॉर्म्युल्यावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.

अनुसूचित जातीसाठी असलेल्या आरक्षणाची विभागणी तीन मुख्य श्रेणींमध्ये करण्यात आली आहे.

श्रेणी 1 (Category 1): 5.25% आरक्षण (मादिगा आणि संबंधित जाती/दलित डावे).

श्रेणी 2 (Category 2): 2.25% आरक्षण (होलेया आणि संबंधित जाती/दलित उजवे).

श्रेणी 3 (Category 3): 4.5% आरक्षण (भोवी, लमाणी, कोरमा, कोराचा आणि 59 भटक्या जमाती).

Marathi Compulsion : मुजोरी केली, तर थेट परवानाच रद्द; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा थेट इशारा

राज्यातील रिक्षा-टॅक्सीसह सर्व प्रकारच्या प्रवासी वाहनचालकांना मराठी भाषा शिकावीच लागेल. मी मराठी शिकणार नाही, अशी मुजोरी त्यांनी केल्यास ती सहन केली जाणार नाही, त्या वाहनचालकाचा परवाना रद्द केला जाईल, असा खणखणीत इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला.

सोलापूर जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळावरील 938 भोंगे काढले

माढ्यातील भोंदू मनोहर भोसले याला अटक करण्यात आली आहे. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.  

पुण्यात 'मुळशी पॅटर्न' स्टाईल हल्ला, सलूनमध्ये गोळीबाराची घटना. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजून ४० मिन सुमारास ५ जणांच्या टोळक्याने वारजे भागात असलेल्या एका सलून च्या दुकानात जाऊन एका तरुणावर गोळीबार केला. या घटनेत २ जणं जखमी झाले.

Vidarbha LIVE : विदर्भात उष्णतेची लाट,अकोल्यात सर्वाधिक 45 डिग्री तापमानाची नोंद

Maharashtra Govt Worker Teacher Strike: सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीकडून सरकारी कर्मचारी शिक्षकांचा संप स्थगित करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर आहेत. गोदा ते नर्मदा जल यात्रा अभियानाचा प्रारंभ फडणवीस यांच्या होणार आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ देखील जल यात्रेत होणार सहभागी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT