मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा धुरळा शांत झाला असला तरी, न्यायालयीन लढाईनं आता जोर धरलाय. तब्बल 79 नगरसेवकांच्या निवडीविरोधात न्यायालयात निवडणूक याचिका दाखल झाल्याची धक्कादायक माहिती RTIमधून समोर आलीय. निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकार, मतमोजणीतील गोंधळ आणि उमेदवारी अर्जातील त्रुटी अशा विविध मुद्द्यांवरून या निवडीला आव्हान देण्यात आलंय. मुंबईतील महत्त्वाच्या प्रभागांतील नगरसेवकांचा यात समावेश असल्यानं न्यायालयाच्या निर्णयावर आता महापालिकेतील सत्तेचं भवितव्य अवलंबून असणार आहे.
माझ्या पायाला दुखापत झाली होती, ती जखम जवळपास महिना ते सव्वा महिना बरी झाली नव्हती, त्यामुळे मी विधीमंडळाच्या अधिवेनाला उपस्थित राहू शकले नाही. पण आता ती जखम बरी झाली आहे, असे स्पष्टीकरण आमदार भावना गवळी यांनी विधीमंडळातील गैरहजेरीवर दिले.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये वीस वर्षीय मुलाला ब्लॅकमेल करून धर्मांतर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीला धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याचेही सांगितले जात आहे. पीडित मुलीवर दबाव टाकून जबरदस्तीने धर्मपरिवर्तन केल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. ती मूळची मध्य प्रदेशातील असून ती सध्या भुसावळमध्ये शिक्षण घेत आहे. मध्य प्रदेशमध्ये गुन्हा दाखल होऊन तो भुसावळमध्ये वर्ग करण्यात आला आहे.
नीट पेपरफुटीप्रकरणी मोटेगावकर क्लासचे शिवराज मोटेगावकर यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आरसीसी नाव सुनकर प्लावर समझे क्या. आरसीसी मे तो हर कोई फायर है. ऑफलाईन रहने दो या ऑनलाईन रहने दो, झुकेगा नही साला, अशा प्रकारच्या संवादाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या जलक्रांती कार्यक्रमात गोंधळ घालण्यात आला होता. त्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत त्यांच्या हातातील बॅनर काढून घेतले होते, त्यातील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सोन्यापाठोपाठ केंद्र सरकारने आता चांदीच्या आयातीवही निर्बंध लावले आहेत, त्याचा परिणाम चांदीच्या बाजारभावावर झाला आहे. चांदीच्या दरात तब्बल सात हजार रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचा दर आज जीएसटीशिवाय २ लाख ७० हजार रुपयांवर पोचला आहे.
नीट पेपरफुटीप्रकरणी पुण्यातील सीबीआय कार्यालयात संशयित विद्यार्थी व पालकांची चौकशी केली जात आहे. अटक केलेल्या प्राध्यापक व मध्यस्थांकडून या विद्यार्थी-पालकांपर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचल्या होत्या.
शिवराज मोटेगावकर याच्याकडे नीट परीक्षेच्या दहा दिवस आधीच प्रश्नपत्रिका आली होती. ३ मे रोजी परीक्षा झाल्यानंतर त्याने पुरावे नष्ट केले होते. त्याने कोणत्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दिला, याचा तपास सुरू आहे.
नीट पेपरफुटीप्रकरणी अखेर लातूर येथील आरसीसी कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयकडून ११ तासांच्या चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली.
पेट्रोलचा तुटवडा जाणवू लागल्याने बुलढाण्यात पेट्रोल पंपांवर वाद होत आहेत. यापार्श्वभूमीवर पेट्रोल पंपचालकांना पोलीस संरक्षणात पेट्रोल विक्री करावी लागत आहे. जिल्ह्यातील निम्म्याहून पंपांवर इंधन साठा संपल्याचे वृत्त आहे.
गडचिरोली जिल्ह्यात डिझेलच्या कमतरतेमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पेट्रोल पंपांवर वाहनांच्या सुमारे 4 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या असून इंधनासाठी रांगेत थांबावे लागत आहे. या परिस्थितीमुळे वाहतूक व्यवस्था आणि दैनंदिन कामांवर परिणाम झाला असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात डिझेलची मोठी कमतरता निर्माण झाल्याने नागरिकांसह शेतकरी अडचणीत आले आहेत. अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध नसल्याने वाहनधारकांची गैरसोय वाढली आहे. शेतीच्या महत्त्वाच्या काळात ट्रॅक्टर, पंप आणि कृषी यंत्रणा बंद पडल्याने शेतकामांवर परिणाम झाला असून, तातडीने डिझेल पुरवठा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.
NEET पेपरफुटी प्रकरणाच्या तपासासाठी CBIचे पथक गेल्या चार दिवसांपासून लातूरमध्ये ठाण मांडून आहे. कोचिंग क्लासेस, संशयास्पद व्यवहार आणि संबंधित व्यक्तींची कसून चौकशी सुरू आहे. तपास यंत्रणांनी पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया वेगवान केली असून या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी चर्चा रंगली आहे.
कांद्याचे दर सतत कमी होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. याच्या निषेधार्थ संभाजीनगरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांना कांद्याला हमीभाव द्यावा आणि तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. कांदा उत्पादकांच्या अडचणींमुळे परिसरातील राजकीय वातावरणही तापले आहे.
कांद्याला अत्यल्प दर मिळत असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. लासलगाव बाजार समितीत आज शेतकऱ्यांनी एल्गार आंदोलन सुरू करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कांद्याला किमान 3000 रुपये हमीभाव आणि 1500 रुपये अनुदान तातडीने जाहीर करावे, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे.
लातूर शहरातील एका नामांकित खासगी क्लासेसच्या कार्यालयात सीबीआयच्या पथकाने रविवारी रात्री अचानक तपासणी करत झाडाझडती सुरू केली. दोन दिवसांपूर्वी संबंधित क्लास चालकांच्या घरी जाऊन चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा चार सदस्यीय सीबीआय पथकाने क्लासेसच्या कार्यालयात जाऊन कागदपत्रांची पडताळणी आणि तपासणी केली. रात्री उशिरापर्यंत हे पथक कार्यालयात उपस्थित होते.
केंद्र सरकारने आता चांदीच्या अनेक प्रकारांना फ्री आयात धोरणातून काढून टाकण्यात आलं-चांदीला मर्यादित आयात श्रेणीत टाकण्यात आले आहे.
अशोक खरात याचा आज ED कडून ताबा घेतला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. अशोक खरात याला आज सिन्नर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. लैंगिक शोषण आणि फसवणूक प्रकरणात अशोक खरात गेल्या 2 महिन्यापासून कोठडीत आहे. सिन्नर मधील आर्थिक फसवणूक प्रकरणात पोलिस कोठडीत असलेल्या अशोक खरातला आज न्यायालयीन कोठडी मिळाल्यास ED घेणार अशोक खरात याचा ताबा घेतला जाईल.
शिवसेना नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे आज नाशिक दौऱ्यावर असून ते नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत घेणार बैठक घेणार आहेत. बैठकीला मंत्री उदय सामंत आणि दादा भुसे देखील राहणार उपस्थित राहणार आहेत.
केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथे विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर दोन आठवड्यांनी आज नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ सरकारमध्ये V. D. Satheesan मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्यासह एकूण 21 मंत्री असतील. रविवारी V. D. Satheesan यांनी लोक भवन येथे जाऊन राज्यपाल Rajendra Vishwanath Arlekar यांच्याकडे मंत्रिमंडळाची यादी सुपूर्द केली.या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मलिकार्जन खर्गे, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत।
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.