र्थ मुंबईत काँग्रेसने निवडणूक आयोगाविरोधात जोरदार निदर्शन केली... काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आलं.यावेळी निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या राज्यसभेच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज बाद केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.
‘मेडिसिटी’ ही रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि प्रतिभेला एका एकात्मिक केंद्रात एकत्र आणणारी जागतिक दर्जाची आरोग्य सेवा परिसंस्था उभारण्याची राज्य शासनाची संकल्पना आहे. ही संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘हील इन इंडिया’ या दृष्टिकोनाशी सुसंगत असून लवकरच ती प्रत्यक्षात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अध्यक्ष मुळशी तालुका काँग्रेस कमिटी माण हिंजवडी परिसरातील अवैध दारूधंदे हॉटेल मधील अवैध दारूविक्री व्यवसायावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. अवैध धंद्याची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी हिंजवडी पोलिस ठाण्यात मुळशी काँग्रसेचे अध्यक्ष सुरेश पारखी यांच्या पुढाकारने निवेदन देण्यात आले. पोलिसांना दिलेल्या निवेदनावर किसान सेनेचे अध्यक्ष चंद्रकांत लामखेडे, कार्याध्यक्ष सोमनाथ मातेरे, उपाध्यक्ष काशीनाथ दातीर, एससी सेलचे अध्यक्ष सोनू भालेराव, युवक काँग्रेस मुळशीचे कार्याध्यक्ष महेश मोहोळ यांच्या स्वाक्षरी आहेत.
काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असताना जवान अर्जुन राजेंद्र जाधव वय 30 यांना हॅन्ड ग्रॅनाईटच्या स्फोटात वीरमरण आले. लष्कराच्या बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपचे ते जवान होते. सध्या काश्मीरमध्ये 8 RR मध्ये कार्यरत होते. अर्जुन जाधव यांच्या मागे पत्नी एक मुलगा आई वडील भाऊ असा परिवार आहे. त्यांच्यावर त्यांच्या शहापूर या गावी शुक्रवारी अंतिम संस्कार होणार आहेत. 25 जून रोजी त्यांच्या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी ते 15 जूनला सुट्टीवर येणार होते. त्या अगोदरच त्यांना वीरमरण आल्याने कुटुंबासह संपूर्ण शहापूर गावावर शोककळा पसरली आहे.
दिल्लीत गाजलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनाची धग आता पुण्यात पोहोचणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत शड्डू ठोकल्यानंतर, या पार्टीचे नेते अभिजीत दिपके यांनी आता महाराष्ट्रातील पहिल्या आंदोलनासाठी थेट विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याची निवड केली आहे. उद्या दुपारी ४ वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हे आंदोलन पार पडणार आहे. 'आप'च्या काळातील याच 'पुणे कनेक्ट' आणि तरुणांमधील थेट संपर्काचा वापर करून दिपके यांनी पुण्यात आंदोलनाचे जाळे विणल्याचे बोलले जात आहे
महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी मंगळवारी लोणी काळभोर येथे दौरा करुन शेतकरी व वितरकांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच त्यांना मार्गदर्शन केले. परंतु शासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनांचा ताफा अचानक दाखल झाल्यानंतर कृषी भांडारांवर मोठी कारवाई सुरू झाल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे अनेक व्यापारी, कृषी केंद्र चालक आणि व्यावसायिकांनी संभाव्य कारवाईच्या भीतीने दुकाने बंद करण्याची तयारीही सुरू केली. परंतु हा दौरा पूर्वनियोजित असून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि खतांच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यासाठी कृषी आयुक्त आले असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेची निवडणुकीचे रण सध्या तापू लागले आहे. सातारा आणि सांगलीकडे महायुतीचे संख्याबळ अधिक असले तरी स्थानिक राजकारण, कुरघोड्या, शह - कटशाह यामुळे दोन्ही जिल्ह्यातील राजकारण गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. सांगली जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडी सोबत गेलेली राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तर सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादीला दिलेला धक्का याचे उट्टे काढण्याची संधी दोघांपुढे देखील आहे.
सांगलीच्या खानापूर तालुक्यामध्ये शक्तीपीठ महामार्गासाठी ड्रोन सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे, दोन सर्वेक्षण थांबवा आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी थेट विटा तहसील कार्यालयावर धडक दिली यावेळी प्रशासनाच्या राजू शेट्टी यांनी अधिसूचना नसताना रोज सर्वेक्षण कशासाठी केला जातो असा विचार सांगली कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा गाड्या अडवून, त्यांच्या सभेत घुसून मुख्यमंत्र्यांना जाब विचारू, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
सांगली महापालिकेच्या विविध विभागातील तब्बल 37 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आला आहे. कामावर हजर राहत नसल्याचा ठपका ठेवत महापालिका आयुक्त संगीता महापत्रा यांनी ही धडक कारवाई केली आहे. सफाई विभागासह पाणीपुरवठा, अग्निशमन, बांधकाम व सुरक्षा विभाग मधील कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. एकाच वेळी 37 कर्मचाऱ्यांच्यावर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे महापालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांना बुधवारी(ता.10 जून) मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सोलापूर काँग्रेसचे जिल्हा संघटक रमेश हसापुरे यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. हसापुरे हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मोठे नेते मानले जातात.त्यांनी यापूर्वी विधानसभा निवडणूकही लढवली आहे.
पंजाबमध्ये एका कार्यक्रमात बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी 'ऑपरेशन ब्लू स्टार' हा काळा दिवस असल्याचं विधान केलं आहे. महाजन यांच्या या विधानानंतर नवा वाद पेटला आहे. विरोधकांनी त्यांच्या या विधानावर आक्षेप घेतानाच कडवट शब्दांत त्यांच्यावर हल्लाबोलही केला आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेसच्या काळात शिखांवर अन्याय, अत्याचार झाला, याचा निषेध आम्ही जन्मभर करत राहू,असं फडणवीस म्हणाले.
देशात सध्या कॉकरोच जनता पार्टीची सगळीकडे चर्चा आहे. नीट परीक्षेत झालेल्या गोधळांचा मुद्दा या कॉकरोच जनता पार्टीने उचलू धरला आहे. याच मुद्द्यावरून सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या उपस्थितीत 6 जून रोजी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर मोठे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. आता कॉकरोच जनता पार्टीकडून पुण्यातही आंदोलन केले जात आहे. दरम्यान, अभिजित दीपके यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे आता केंद्र सरकारवर दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे. यावेळी त्यांनी येत्या 20 जून रोजी दिल्लीत आणखी मोठे आंदोलन केले जाईल, अशी घोषणा केली.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार ममता बॅनर्जी यांना आणखी एक झटका बसला आहे. २० खासदारांच्या बंडानंतर आता आणखी एका जुन्या खासदारानं त्यांची साथ सोडली आहे. तृणमूलच्या राज्यसभा खासदार सुष्मिता देव यांनी आपल्या आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांची दिल्लीत भेटही घेतली.
पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कुटुंबांतील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी गणवेश, बूट, मोजे, दप्तर, वह्या, पुस्तके तसेच चित्रकला साहित्य यासाठी सुमारे ₹47 कोटी 65 लाखांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
वरोरा पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात धडक कारवाई करत एका इसमाकडून एमडी (मेफेड्रॉन) ड्रग्जसह कार, मोबाईल असा एकूण १० लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपी गुलाम गौस अब्दुल हमीद सिद्दीक (वय ३६)याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो शिवसेनेच्या (शिंदे) वाहतूक सेनेचा जिल्हाध्यक्ष आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी पुण्यातील काँग्रेस नगरसेवक आणि माजी शहराध्यक्ष असलेल्या अरविंद शिंदे यांनी थेट दिल्लीतील प्रक्षश्रेष्ठींकडे केली आहे.
सांगली सातारा विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सातारा झेडपीत गेल्या काही दिवसांत जे राजकीय नाट्य घडले होते. त्या विरोधातील राग मतदानातून व्यक्त करण्याची हीच पहिली आणि शेवटची संधी असल्याचं सांगत महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे.
भिवंडी महापालिकेतील अधिकारी सुरेंद्र भोईर यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अडीच लाख रुपयांची लाच घेताना ताब्यात घेतलं आहे. अनधिकृत बांधकामावर कारवाई करु नये यासाठी त्यांनी लाच मागितल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सोसायटीमधील जैन कुटुंबीयांनी सोसायटीत कुणालाही न विचारता पांढरी पट्टी मारली होती. या पांढऱ्या पट्टीला सोयायटीमधील इतर सदस्यांनीही विरोध दर्शवला होता. माध्यमांनीही हा मुद्दा उचलून धरला होता. यावर मनसेची प्रतिक्रिया समोर आली आहे. पांढऱ्या पट्ट्या मारून सांस्कृतिक दहशतवाद परसवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची या पुढे तोंड काळी करण्यात येतील, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे.
पाकिस्तानच्या लष्कराच्या लढाऊ विमानांनी रात्रीच्या अंधारात अफगाणिस्तानच्या हवाई हद्दीचे उघडपणे उल्लंघन केले. पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या निवासी घरांना लक्ष्य करत भीषण बॉम्बफेक केली आहे. या अमानुष हवाई हल्ल्यात 11 निष्पाप बालकांसह एकूण 13 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे
शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता विदर्भातील शाळा 22 जूनपासून सुरू केल्या जाणार असून, उर्वरित राज्यभरातील शाळा 15 जूनपासून सुरू होतील. तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे विदर्भातील शाळा 22 जूनपासून सुरु होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला धक्का बसण्याची शक्यता आहे. पक्षातील अंतर्गत धुसफूसीमुळे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले आहे.
अमेरिकेने पुन्हा एकदा इराणवर जोरदार हल्ला केला आहे. बुधवारी पहाटे अमेरिकन लष्कराकडून इराणवर जबरदस्त क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. यामध्ये होमुर्झ सामुद्रधुनीच्या परिसरातील इराणचे रडार, ड्रोन आणि हवाई संरक्षण प्रणालीला लक्ष्य करण्यात आल्याची माहिती अमेरिकन लष्कराच्या सेंट्रल कमांकडून देण्यात आली.
धाराशिव जिल्ह्यातील आठ तालुक्यातील कृषी निविष्ठा वाटपाचे रेकॉर्ड पथकाने ताब्यात घेतलं आहे. ज्या शेतकऱ्यांना निविष्ठा वाटप केल्या, त्यांची थेट चौकशी होणार आहे. निविष्ठा वाटप झाल्या की फक्त कागदावरच वाटप झाल्या, याचे पथक थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून चौकशी करणार आहे. चौकशी समितीच्या अहवालात दोषी आढळल्यावर फौजदारी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
लातूरच्या उदगीर येथे उदगीर जळकोट महामार्गाजवळ, लाखो रुपयाचे शासकीय औषधाचा साठा फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या औषधाच्या साठ्यात एचआयव्ही चाचणी संदर्भातील महत्त्वाचे वैद्यकीय कीट असल्याचं दिसत आहे. लाखो रुपयाचे ही चाचणी किट कालबाह्य असल्याचे समोर आलं आहे. आरोग्य व्यवस्थेच्या यंत्रणेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
अमरावती विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. काँग्रेस उमेदवार हर्षजीत देशमुख निवडणुकीतून अचानक गायब झाल्याचे चित्र आहे. ते नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची सूत्रांची माहिती आहे. निवडणूक सोडून काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख अचानक रुग्णालयात भरती झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेस उमेदवार हर्षजीत देशमुख भाजपला मॅनेज झाल्याची चर्चा देखील आहे. काँग्रेसकडून वंचितचे उमेदवार नीलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वंचित अन् काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये याविषयी बोलणी सुरू असून, यापूर्वी वंचितने काँग्रेसला पाठिंब्याची मागणी केली होती.
‘राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020’ अंतर्गत ब्रिटनमधील दोन आणि ऑस्ट्रेलियातील एका विद्यापीठाला भारतात आपले कॅम्पस सुरू करण्यासाठी मंगळवारी मंजुरीपत्रे प्रदान करण्यात आली. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत या तीन प्रसिद्ध विदेशी विद्यापीठांना ही पत्रे सोपवण्यात आली. यामध्ये ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल आणि युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क या दोन विद्यापीठांचा समावेश असून, मुंबईत त्यांचे कॅम्पस उभारले जातील. ऑस्ट्रेलियातील ‘युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साउथ वेल्स’ हे विद्यापीठ बंगळुरूमध्ये आपले शैक्षणिक संकुल स्थापन करणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.