Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update : पुणे ग्रामीण जिल्ह्यात 13 ते 26 जूनपर्यंत जमावबंदी आदेश

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 11 June : देशासह महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांचे LIVE अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

सरकारनामा ब्युरो

खिंडकर बंधूचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर; भावाला बेदम मारहाण

बीडमध्ये पंचायत समिती कार्यालयात जोरदार हाणामारी झाल्याचे समोर आले असून या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. तर खिंडकर बंधूचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दादासाहेब खिंडकरने पंचायत समिती कार्यालयातच भावाला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ आता समोर आला असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दादासाहेब खिंडकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तू काळी.. पांढऱ्या पायाची आहेस.. सतत मानसिक छळ करून डोक्यात धारदार शस्त्राने वार करत विवाहितेची हत्या

बीडच्या कुटेवाडी येथे दोन दिवसांपूर्वी एका विहिरीत 23 वर्षीय विवाहितेचा मृतदेह आढळून आला होता. विवाहितेच्या डोक्यात गंभीर जखम दिसून आली. यात पोलिसांनी केलेल्या तपासात सासरच्यांनीच महिलेच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचं समोर आलं. याप्रकरणी मृतविवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पती, सासरा आणि सासू यांच्या विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात खुनाचा आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकरी कर्जमाफी अंमलबजावणीसाठी समिती

शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन केली जाणार आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. पात्र, अपात्र शेतकऱ्यांची यादी बनवण्यासाठी समिती काम करणार आहे.

जिल्हा परिषद सदस्याचे जात प्रमाणपत्र अवैध

जिल्हा परिषद निवडणुकीत अनुसूचित प्रवर्गातून निवडून आलेले पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य महेश उर्फ दरगोंडा बसगोंडा पाटील यांचे जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आल्याची नोंद ऑनलाईन पोर्टलवर

उड्डाणपूलाची निविदा तातडीने काढावी – स्थायी समिती सदस्य दिपेश म्हात्रे यांची मागणी

डोंबिवली पश्चिमेतील वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी उपाय ठरणाऱ्या मोठागाव रेल्वे क्रॉसिंग एलसी-१ उड्डाणपूल प्रकल्पाची निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून निविदा काढण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे स्थायी समिती सदस्य दिपेश म्हात्रे यांनी दिनांक १० जून रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत केली.

सदर प्रकल्पाची सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना निवडणूक आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. मात्र, डोंबिवलीकर नागरिक अनेक वर्षांपासून या प्रकल्पाची प्रतीक्षा करत असल्याने प्रशासनाने कोणताही विलंब न करता निविदा प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी श्री. म्हात्रे यांनी केली.

पुणे ग्रामीण जिल्ह्यात 13 ते 26 जूनपर्यंत जमावबंदी आदेश

पुणे ग्रामीण जिल्ह्यात अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये जमावबंदी आदेश लागू केला आहे. हा आदेश दिनांक 13 जून 2026 रोजी रात्री 12.05 वा. पासून ते 26 जून 2026 रोजी 24 वाजेपर्यंत वाजेपर्यंत लागू राहणार आहे.

या कालावधीत दाहक अथवा स्फोटक पदार्थ बाळगणे, दगड, शस्त्रे, काठ्या, तलवारी, बंदुका आदी इजा पोहोचवू शकणारी साधने बाळगणे, मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, प्रतिकात्मक पुतळ्यांचे प्रदर्शन किंवा दहन करणे तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारी आवेशपूर्ण भाषणे करणे यास मनाई करण्यात आली आहे.

Raj Thackeray ठाण्यात मारहाण झालेल्या वृद्ध व्यक्तीशी राज ठाकरे यांचा फोनवरुन संवाद

ठाण्यात मारहाण झालेल्या वृद्धाशी राज ठाकरेंनी संवाद साधलाय... फोनद्वारे राज ठाकरेंनी वृद्धाशी संवाद साधत त्यांची विचारपूस केलीय... यावेळी वृद्धाच्या पत्नीनं राज ठाकरेंचे आभारही मानलेत...

बीडमध्ये खळबळ; ग्रामपंचायत वादातून सख्ख्या भावांमध्ये हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

बीडमध्ये दादासाहेब खिंडकर आणि समाधान खिंडकर या दोन भावांमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ग्रामपंचायतीच्या कामावरुन दादासाहेब खिंडकरने भाऊ समाधान खिंडकरला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय... याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दादासाहेब खिंडकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय...

गोकुळ गीतेंचा भविष्यात विचार केला जाईल : महाजन

नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गिते यांनी माघार घेतली. आपण प्रचार थांबवत असल्याचे त्यांनी जाहीर केलं. गिते यांचा भविष्यात विचार केला जाईल असं आश्वासन मंत्री महाजन यांनी यावेळी दिलं.

अमरावतीत एमआयएमचे नगरसेवक किरीट सोमय्यांच्या गाडीसमोर झोपले; पोलिसांसोबत बाचाबाची

भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे अमरावती महापालिकेत गेले असताना एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीच्या समोर आंदोलन केले. एमआयएमचे नगरसेवक सोमय्या यांच्या गाडीच्या आडवे झोपले, त्यावेळी पोलिसांनी त्यांना बाजूला केले. या वेळी पोलिस आणि एमआयएम नगरसेवकांमध्ये बाचाबाचीही झाली. त्यानंतर भाजप आणि एमआयएमचे कायकर्ते आमने सामने आले होते.

अजितदादांच्या स्पष्टवक्तेपणामुळे काँग्रेसकडून जागा सोडवून घेणे सोपे व्हायचे : सुनील तटकरे

विधानसभेच्या २००४ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाशी कटुता घेण्याचे काम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काँग्रेस पक्षाकडून जागा सोडवून घेताना अजितदादांचा स्पष्टवक्तेपणा उपयोगात आला होता, अशी आठवण प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापनदिन कार्यक्रमात बोलताना सांगितला.

परप्रांतीयाकडून मारहाण झालेल्या वृद्धाला राज ठाकरे, श्रीकांत शिंदे यांचा फोन

ठाण्यात परप्रांतीयाकडून वयोवृद्ध व्यक्तीला मारहाण करण्यात आली होती. त्यांना दवाखान्यात ॲडमीट करण्यात आले असून त्यांची खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी फोन करून विचारपूस केली.

दौंड तालुक्यातील तब्बल 400 गुऱ्हाळघरे बंद

ऊस आणि गुळाचा दर निर्माण झाल्याने दौंड तालुक्यातील तब्बल ४०० गुऱ्हाळघरे बंद ठेवण्याचा निर्णय गुऱ्हाळमालकांनी घेतला आहे. गेल्या आठवड्यात तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासन विभागाने खामगाव, बोरीपार्धी येथील गुऱ्हाळघरांवर छापा टाकून तब्बल १७ लाख रुपयांचा खराब गूळ जप्त केला होता. त्यानंतर गुऱ्हाळचालक-मालकांच्या बैठकीत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नियमानुसार भेसळमुक्त गूळ तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण त्यासाठी उसाचा भाव कमी करण्याची मागणी परप्रांतीय गुऱ्हाळचालकांनी गुऱ्हाळमालकांकडे केली आहे. त्याच मुद्यावरून परप्रांतीय ४०० गुऱ्हाळघरे बंद ठेवण्यात आली आहेत.

गोकुळ गीतेंना भविष्यात संधी दिली जाईल; त्यांनी माघार घेऊन किशोर दराडेंना पाठिंबा द्यावा : गिरीश महाजन

गोकुळ गीते यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यांनी माघार घेऊन शिवसेनेचे किशोर दराडे यांना पाठिंबा द्यावा. त्यांच्यावर कोणीही दबाव टाकलेला नाही, त्यांचा भविष्यात विचार केला जाईल. गीते यांचा म्हाडाचा विषय जुना आहे, त्यांना न्यायप्रविष्ठ प्रकरणातून नोटीस आली आहे, असे गिरीश महाजन यांनी त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सांगितले.

आम्ही कुठलंही ऑपरेशन टायगर करत नाही - संजय शिरसाट

आम्ही कोणतेही ऑपरेशन टायगर करीत नाही. ज्यांना यायचं आहे, त्यांना आम्ही नाही म्हणणार नाही. आता आमची मानसिकता नाही मात्र जेव्हा ऑपरेशन टायगर करायचं असेल तेव्हा एकनाथ शिंदे ठरवतील. आमच्या संपर्कात अनेकजण आहेत. काही महिन्यात हे सर्व एकत्र राहतील असं वाटत नाही.

बंडखोर अपक्ष उमेदवार गोकुळ गीते निवडणुकीतून माघार घेणार आहेत, यासाठी शिवसेनेचे नेते उदय सामंत हे गीते यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. पत्रकार परिषदेत ते लवकरच माघारीची घोषणा करणार असल्याची माहिती आहे.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणर? तारीख आली समोर

लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्याच्या प्रतिक्षा आहे. पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात येत्या १२ ते १५ जून दरम्यान योजनेचे पैसे जमा करण्यात येणार असल्याची माहिती भाजप आमदार मोनिका राजळे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे.

तुकाराम मुंढेंच्या उपस्थितीत दूध भेसळीवर कडक कारवाईसाठी FDAची उद्या मोठी बैठक

राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी येत्या शुक्रवारी (दि.12) मुंबईमध्ये राज्यातील प्रमुख दूधाचे सहकारी व खाजगी दूध उत्पादक संस्थांची महत्वपूर्ण बैठक आयोजित केलेली आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळीला अटकाव करण्यासाठी विभागाने मोहिम हाती घेतली असून अन्न सुरक्षा व गुणवत्ता मानकांचे पालन अधिक प्रभावीपणे करण्यासाठी संबंधित घटकांचेही मत बैठकीद्वारे अजमावून कडक अंमलबजावणी करण्यासाठीचे नियोजन संयुक्त बैठकीतून अपेक्षित मानले जाणार असल्याची माहिती दुग्ध उद्योगातून मिळाली.

नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुती समोर आव्हान उभे करणारे बंडखोर उमेदवार गोकुळ गिते आज आपली बंडाची तलवार म्यान करण्याची शक्यता आहे. आठवडाभरात मनधरणी नाट्य रंगल्यानंतर काल मुबंई गणेश आणि गोकुळ या गिते बंधूंची मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजन या दोघांनी पुन्हा भेट घेतली. सुमारे दोन तासांच्या बैठकीनंतर गोकुळ गिते यांचे बंड शमविण्यात आले आहे. आज दोन्ही मंत्र्यांच्या उपस्थितीत अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे,

मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) वर्धापन दिनाचा कार्यक्रम

मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा २७ वा वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे. सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम होणार आहे.

जयंत पाटील तर कसलेले राजकारणी - जयकुमार गोरे

विधान परिषदेच्या उमेदवारीवरून त्यांनी महायुतीमध्ये साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन्ही राजांना विचारत न घेताच निर्णय घेतले जात असावेत असा माझा अंदाज असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला भाजप नेते जयकुमार गोरे यांनी पाटील यांना प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, "जयंत पाटील यांनी काय बोलावं हा त्यांचा विषय आहे. पण मी जर त्यांना त्यांच्या घरात कोणी विचारत नाही असे म्हटले तर कसे चालेल का? दोन्ही राजांनी फ्रंट फुटवर राहून ही निवडणूक हाताळली आहे. पण विरोधकांचं कामच असतं कुठे काही फट सापडतेय का ते शोधणे आणि जयंत पाटील तर कसलेले राजकारणी आहे अशी मिश्किल टिप्पणी देखील गोरे यांनी केली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज साताऱ्यातील दरे गावी जाणार

पुण्यात आज कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन

पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात आज कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन केलं जाणार आहे.

ठाण्यातील वृद्धाला मारहाण करण्याऱ्या कॅब चालकावर गुन्हा दाखल

ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाबाहेर रस्त्यावर थुंकल्याचा जाब विचारल्यामुळे वयोवृद्ध व्यक्तीला अमानुष मारहाण करणाऱ्या मुजोर परप्रांतीय कॅब चालकाविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील सहकार नगर भागात गोळीबार

पुण्यातील सहकार नगर भागातील शिंदे हायस्कूलच्या परिसरात गोळीबाराची घटना काल रात्री घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी एका मेडिकल बाहेर थांबलेल्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या. या घटनेत संबंधित तरुण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT