मुंबई-पुणे प्रवासासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. १ मेपासून ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. Mumbai ते Pune दरम्यानच्या प्रवासात वेळ वाचवण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
PMPML बस चोरी प्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपालसिंग बलबिरसिंग राणा असं संशियत आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
अशोक खरातच्या फार्महाऊसमधील संशयास्पद व्हिडिओ SIT च्या हाती लागले आहेत. कुकच्या माध्यमातून खरातच्या हालचालींवर CA ललित पोफळेकडून लक्ष ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील बर्डे प्लॉट भागात लग्न समारंभात डीजे वर नाचताना लागलेल्या धक्का लागला आणि त्यातून झालेल्या वादातून एका युवाकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. मोदींनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत लिहिलं की, 'वॉशिंग्टन डीसी मधील एका हॉटेलमध्ये घडलेल्या घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, प्रथम महिला आणि उपराष्ट्रपती सुरक्षित आणि सुखरूप आहात, हे समजल्यानंतर समाधान वाटलं. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो. लोकशाहीत हिंसेला कोणतेही स्थान नाही आणि तिचा निःसंदिग्धपणे निषेधच केलाच पाहिजे.', अशा शब्दात मोदींनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर करत कोणी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात स्थळी अघोरी पूजा करतंय का? असा सवाल उपस्थित केला आहे. मिटकरी यांनी फोटो शेअर करत लिहिलं की, 'काल रात्री दादांच्या प्रतिमेला काही लोक दिवा बत्ती करण्यासाठी गेले असता त्यांना गोजुबावी या ठिकाणी पूजेच्या ताटात 2 लिंब टाचण्या टोचून ठेवलेल्या स्थितीत आढळल्या, हे कुणी जाणीवपूर्वक करतेय की अघोरी पुजा प्रकार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
सोलापूर महापालिका रुग्णालयात आणखी चार बालमाता आढळल्या आहेत. अल्पवयीन माता असल्याचे समजतात डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली. सोलापुरात बालमाता प्रकरणी चौकशीचा ससेमिरा मागे लागताच सरकारी आणि खाजगी डॉक्टर अलर्ट मोडवर आले आहेत. गुरूवारी आणि शुक्रवारी मनपाच्या रुग्णालयात या बालमाता आढळल्या आहेत. बालमाता प्रकरणी माहिती लपवल्याप्रकरणी खासगी आणि सरकारी डॉक्टरांवर गुन्हे दाखल होत आहेत. महापालिकेकडून 130 प्रसूतीगृहातील प्रत्येक प्रसूती महिलेची फेरतपासणी सुरू करण्यात आली आहे.
सोलापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अजय दासरी यांची सुषमा अंधारे हटावची मागणी केली आहे. दुसरीकडे जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांची गद्दार अजय दासरींची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली. सोलापुरात शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची एकमेकांच्या विरोधात पत्रकार परिषद घेत हे आरोप केले.
राजस्थानमधील बहुचर्चित भाजप नेते जयपाल पुनिया हत्याकांडमध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. एडिजे न्यायालयने चार वर्ष जुन्या खटल्याचा निकाल देत माजी मुख्य आरोपी मोती सिंग, आमदार महेंद्र चौधरी याच्यासह नऊ दोषीना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. भाजप नेते जयपाल पुनिया यांची 14 मे 2022 रोजी निर्घृणपणे हत्या केली होती. बोलेरो गाडीतून आलेल्या हल्लेखोरांनी दिवसाढवळ्या त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या हत्येमुळे राजस्थानमध्ये मोठा हादरा बसला होता.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील बर्डे प्लॉट भागात रात्री युवकाच्या खुनाची धक्कादायक घटना घडली. डिजेवर नाचताना लागलेल्या धक्क्यावरून उफाळलेल्या वादातून थेट खून झाला. यामध्ये चार ते पाच जणांनी एका 23 वर्षीय युवकाचा धारदार शस्त्र आणि फायटरने हल्ला करून जागीच ठार केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून एकच खळबळ उडाली आहे. शोएब खान अमीन खान (वय 23, रा. बर्डे प्लॉट, खामगाव) असे मृतक युवकाचे नाव आहे.
देशाचा कणा असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याची अवस्था सध्या ‘दुभंगलेल्या आभाळा’सारखी झाली आहे. मागील 20 वर्षांतील सर्वात भीषण आर्थिक संकटाचा सामना शेतकरी करत आहेत. उत्पादन खर्च आणि मिळणारा भाव यात मोठी दरी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने कांदा उत्पादकांना एकरी 50 हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी केली आहे.
अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या खासदारांच्या गटाने एच-1बी व्हिसा कार्यक्रमावर तीन वर्षांची स्थगिती आणण्याचा प्रस्ताव ठेवत नवे विधेयक काँग्रेसमध्ये सादर केले आहे. ‘एन्ड एच-1बी व्हीसा अब्युज अॅक्ट ऑफ 2026’ या नावाने सादर करण्यात आलेल्या या विधेयकामुळे अमेरिकेत काम करणार्या परदेशी व्यावसायिकांवर, विशेषतः भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचार्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. अरिझोनाचे खासदार एली क्रेन यांनी हे विधेयक मांडले असून सात इतर रिपब्लिकन खासदारांनी त्याला सहप्रायोजकत्व दिले आहे.
महाराष्ट्रात कपाशीच्या एचटीबीटी वाणावर प्रतिबंध असतानाही खरीप हंगामाच्या तोंडावर ही प्रतिबंधित कपाशीची बियाणे तस्करी वाढली आहे. मात्र या प्रतिबंधित बियाण्याची तस्करी रोखण्यासाठी कृषी विभागाने मोहीम सुरू केली असून, काल अमरावतीमध्ये आठ लाख रुपये किमतीचे बियाणे रेल्वे स्थानकावर पोलिसांच्या मदतीने कारवाई करत जप्त करण्यात आले.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीसाठी राज्यभरात आज मतदान होत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने आयएमएमध्ये फूट पडली असून, आयएमए अधिकृत पॅनेलच्या समर्थनार्थ भाजप प्रचारात सक्रिय झाला होता. यामुळे निवडणुकीला राजकीय रंग आला होता. भाजपने आपल्या प्रत्येत पदाधिकाऱ्याला किमान पाच डाॅक्टरांशी संपर्क साधण्याचे आदेश दिले होते. या निवडणुकीच्या निकालीची उत्सुकता असणार आहे.
जळगावात एकनाथ शिंदे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांचे भावी आमदार आशयाचे बॅनर झळकले आहे. जळगाव शहरातील स्वातंत्र्य चौक, आकाशवाणी चौक सह वेगवेगळ्या चौकांमध्ये प्रतापराव पाटील भावी आमदार, अशा आशयाचे बॅनर लागलेत.
बागेश्वर धाम सरकारचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा नांदेडमधील इतिहास अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी केला निषेध. बागेश्वर धाम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेले वक्तव्य अतिशय निषेधार्य असून छत्रपती शिवाजी महाराजाचा अवमान करणार आहे. रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांचं गुरू-शिक्षक किंवा मार्गदर्शक नव्हते. इतिहासाच्या कुठल्याही साधनांमध्ये रामदासांचा उल्लेख नाही, असे इतिहास अभ्यास डाॅ. श्रीमंत कोकाटे यांनी म्हंटलं आहे.
हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलावंत रितेश देशमुख यांचा 'जय शिवाजी' हा भव्यदिव्य मराठी चित्रपट 1 मे रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्त रितेश देशमुख व अभिनेत्री जेलिना देशमुख यांनी भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा इथल्या शिवक्रांती प्रतिष्ठानच्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ याठिकाणी आले होते. आमदार संजय गायकवाड व धीरेंद्र महाराज बागेश्वर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी काढलेल्या आक्षेपार्ह विधान मी काही ऐकलेले नाही. परंतु महाराजांबद्दल अपशब्द वापरलेले कोणीही खपवून घेणार नाही, असे रितेश देशमुख यांनी स्पष्ट केले.
इराणविरुद्ध इस्त्रायल आणि अमेरिका युद्धादरम्यान इस्त्रायलने आॅपरेशन विंग्ज आॅफ डाॅन मोहिमेअंतर्गत मणिपूरमधील बेने मेनाशे समुदायाच्या 240 लोकांना आपल्या देशात नेले आहे. गेल्या 20 वर्षांत या समुदायाच्या चार हजार सदस्यांनी स्थलांतर केले आहे. तर 2030 पर्यंत आणखी सहा हजार लोकांना नेण्याची योजना आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.