लातूरच्या देवणी तालुक्यातील बोंबळी( बु) येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड याचा एक बैल वीज पडून मृत्युमुखी पडला, आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे या शेतकऱ्याला दुसरा बैल घेणे शक्य झालं नाही, शेतीत मशागत करण्यासाठी बैलाबरोबर पत्नीच्या खांद्यावर नांगराचा जू देण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली आहे, हालाकीच्या परिस्थितीत बैल घ्यायचा कसा असा प्रश्न या शेतकरी दांपत्या पुढे उभा टाकला. सरकारने मदत करावी अशी आशाही या शेतकरी दांपत्याने व्यक्त केली आहे.
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत वेगवान राजकीय घडामोडी घडू लागले आहेत. शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाला. ज्यानंतर या निर्णयाविरोधात अपील करणार असून समीर सत्तार यांचा अर्ज 100% स्वीकारला जाईल अशी खात्री असल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.
मुंबई गोवा महामार्गावर महाड येथे कॅनमध्ये पेट्रोल घेऊन जाणाऱ्या एका दुचाकीला अचानक आग लागली. या आगीच्या झळा शेजारी उभ्या असलेल्या वॅगनर कारला लागल्या आणि कारने देखील पेट घेतला. बचाव पथकाने दोन्ही वाहनांना लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र या आगीत दोन्ही वाहनांच मोठे नुकसान झाल. या अपघातानंतर दुचाकीवरून होणाऱ्या बेकायदेशिररित्या पेट्रोलच्या वाहतुकीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे
अकोला जिल्हा रुग्णालयातील व्हायरल व्हिडिओनंतर घटनेतील दोषी कर्मचाऱ्यांना रुग्णालय प्रशासनाकडून अद्यापही कारवाई नाही. अकोला जिल्हा रुग्णालयात स्ट्रेचर नसल्याने पतीला पाठीवर घेऊन उपचारासाठी वणवण फिरणाऱ्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात उडाली होती मोठी खळबळ. व्हायरल व्हिडिओमध्ये महिला पतीला पाठीवर घेऊन जात असताना तिला मदत न करता तंबाखू चोळत बसणाऱ्या 'वॉर्ड बॉय' आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी रुग्णालयाचे अधिष्ठाता संजय सोनुने यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची केली मागणी.
महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटखा आणि सुगंधी पानमसाल्याविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोहिम छेडली आहे, या मोहिमेंतर्गत पिंपळनेर येथे आज धडक कारवाई करुन वाहनासह लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे, या कारवाईमुळे गुटखा तस्कर व गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
माजी आमदार विप्लव बाजोरिया यांना सर्वोच्च न्यायालयात देखील दिलासा मिळालेला नाही. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये प्रतिज्ञा पत्रावरील त्रुटीच्या आरोपानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने बाजोरिया यांचा अर्ज रद्द केला होता. ज्यानंतर त्यांनी नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. तेथे अंतरिम दिलासा देण्यास खंडपीठाने नकार देत 17 जूनला सुनामी ठेवली होती. त्यानंतर बाजोरीया यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.
नवनीत राणा यांना राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला होता. मात्र राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची अट मान्य नव्हती, असा गौप्यस्फोट माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला. एवढं मोठं पद घ्यायचं आणि ज्या पक्षानं आपल्याला राज्यसभेवर पाठवलं, त्या पक्षाचं सदस्य व्हायचं नाही, ही भूमिका योग्य नाही. ज्या पक्षाने आपल्याला राज्यसभेवर पाठवलं, त्या पक्षाचं सदस्या होण्यात काहीच अडचण नव्हती, असेही खडसे यांनी स्पष्ट केले.
तृणमूल काँग्रेस पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आज काँग्रेसच्या माजी अध्यक्षा साेनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. या दोघींमध्ये तब्बल ४५ मिनिटे चर्चा झाली. तृणमूल पक्षात घडत असलेल्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.
नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी मनीषा वाघमारे हिचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. सीबीआयने केलेल्या विनंतीनंतर कोर्टाने मनीषा वाघमारे हिचा जमीन अर्ज फेटाळला आहे.
खासदार पार्थ पवार आणि आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्या आमदारकीचा राजीनामा कधीही मागितलेला नाही. त्यामुळे शिळ्या कढीला ऊत कुठपर्यंत आणणार असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी केला आहे.
विदर्भातील शाळा १५ जून पासून सुरु करण्याच्या शासनाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती च्या वतीने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली आहे. या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीत शासनाकडून कुठलीही ठोस बाजू मांडण्यात आली नाही. त्यामुळे उद्या सकाळच्या सत्रात यावर सुनावणी होणार आहे.
दीड दोन वर्षे हे आंदोलन चालू आहे याचा अर्थ आम्हाला शक्तीपीठ नको आहे. स्वतःच्या जिल्ह्यात हा महामार्ग न्यायचा नाही मात्र दुसऱ्याचे जिल्ह्यातील हा महामार्ग घेऊन जायचं आणि त्यांचं वाटोळ करायचं. शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत ते हिंदू नाहीत का? असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी केला आहे.
कुठे गेलं तुमचं हिंदुत्व? निवडणुका असतात त्यावेळी हिंदुत्व आठवत, शेतकरी आठवत नाही का? असा सवाल विचारताना गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग आहे मागे एकनाथ शिंदेने शक्तिपीठ नको रद्द केला अस जाहीर केला होत.
तुम्ही त्यावेळी हा शब्द मुख्यमंत्री म्हणून दिला होता की एकनाथ शिंदे म्हणून दिला होता?मुख्यमंत्री म्हणून शब्द दिला होता तर त्याची अंमलबजावणी करणे ही तुमची जबाबदारी आहे. अध्यादेश निघाला कोल्हापुरातील रस्ता रद्द झाला मग परत अध्यादेश कसा निघाला? असंही सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.
सरकार आमच्या शेती पिकाला भाव देऊ शकत नसेल तर आम्हाला खत किती द्यायचं हे ठरवू शकत नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ऑनलाईन पद्धतीने खत वाटपाचा प्रयोग राबवत आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर तो तुम्ही देशभरात राबवणार आहात. मात्र हा प्रयोग फेल झाला तर याची जबाबदारी कोण घेणार? दोन एकर शेती असणाऱ्या मिश्र खत शेतकऱ्यांना फक्त दोन दोन बॅग खत देता आहे. मात्र त्या शेतकऱ्याच्या गहू, मका, कापसाला हवा तसा भाव देत नाही. मात्र त्याला खत किती द्यायचं? हे तुम्ही ठरवत आहात. शासनाचा हा निर्णय आम्हाला मान्य नाही. या निर्णयाचे विरोधात आम्ही जिल्हा कृषी अधिकारी यांना निवेदन दिले आहे. पुढील 48 तासात हा निर्णय रद्द केला नाही तर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचा आंदोलन करण्यात येणार आहे.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेलने दणदणीत विजय मिळवला आहे. विद्यमान कार्यकारिणीच्या या आघाडीने सर्व १४ जागांवर विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले.
फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर येथे मेथेनॉल मिश्रित विषारी गावठी दारू प्यायल्याने झालेल्या नागरिकांच्या मृत्यूनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अवैध दारूधंद्यांविरुद्ध मोठी धडक मोहीम राबवली आहे. २९ मे ते ४ जून २०२६ या कालावधीत विभागाने तब्बल १४२ गुन्हे दाखल करून ११६ आरोपींना अटक केली आहे.
शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज कोल्हापुरात विराट मोर्चा काढला जाणार आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांकडून हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
नाशिक विधानपरिषद निवडणूक दिवसेंदिवस रंजक होत आहे. काल दिवसभर शिवसेना शिंदे पक्षाकडून गोकुळ गीते यांच्या माघारीच्या बातम्या पसरवल्या. महायुतीचे गिरीश महाजन दादा भुसे आणि उदय सामंत यांनी दिवसभर प्रयत्न केले. त्याला यश आले नाही. भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी पक्षाचे गणेश गीते यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर गोकुळ गीते माघार घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र गोकुळ गीते यांनी आपल्या राजकीय अडचणी सांगत मंत्री महाजन व अन्य मंत्र्यांकडे असहाय्यता व्यक्त केली. रात्री उशिरा माघारी बाबतच्या अफवा खोडून काढण्यात आल्या. त्यासाठी स्वतः गोकुळ गीते यांनी आपण माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
वरोरा तालुक्यातील एकार्जुना येथे काल संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसात वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. नितीन चंद्रशेखर डूडुरे असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.
गुरुवारी दुपारी चार वाजता आंदोलन पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन होणार असल्याची माहिती पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हे आंदोलन केलं जाणार आहे.
ऑपरेशन ब्लू स्टारच्या 42व्या स्मृतीदिनानिमित्त पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील चौक मेहता इथं शीख परंपरावाद्यांतर्फे आयोजित कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती खळबळजनक ठरली. अशा प्रकारच्या कार्यक्रमाला राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणारे ते भाजपचे पहिलेच मंत्री ठरले. सहा जून हा काळा दिवस असल्याचे सांगत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुवर्ण मंदिर परिसरात सैन्य पाठवून शीख समाजावर अन्याय केल्याचा आरोप महाजन यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.