Maharashtra Live Politics Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update : मोबाईलवर स्टेटस ठेवल्या कारणावरून 16 वर्षीय मुलावर कोयत्याने हल्ला; सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद...

Marathi Breaking Live Headlines Updates : निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी, सीजेपी, राज्यासह देशातील राजकीय घडामोडी वाचा एका क्लिकवर.

सरकारनामा ब्यूरो

Pune Crime : मोबाईलवर स्टेटस ठेवल्या कारणावरून 16 वर्षीय मुलावर कोयत्याने हल्ला; सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद...

मावळच्या तळेगाव दाभाडे येथे मोबाईलवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून 16 वर्षीय मुलावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ‘King Is Back’ असे मोबाईल स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून हा वाद झाल्याचे सांगितले जात आहे. शिवाजी चौक परिसरातील एका कपड्याच्या दुकानात काम करणाऱ्या देवेंद्र जाधव या मुलावर तीन जणांनी कथितपणे कोयत्याने वार केले. या हल्ल्यात देवेंद्र गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने तळेगाव जनरल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्याची घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Pandharpur News : चंद्रभागा वाळवंटात एक लाख भाविकांचे स्वच्छता अभियान; नगरपालिका व वारकऱ्यांचा पुढाकार

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या चंद्रभागा नदीच्या वाळवंटात आज स्वच्छता अभियान राबवण्यात आले. पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने या स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत वारकरी संप्रदाय आणि नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

Jalgaon Gold : दसरा सणाला गोल्ड सिटी जळगाव मार्केटमध्ये तेजी घटल्याचे व्यापार्‍यांचे निरीक्षण

जळगाव दसऱ्यानिमित्त दरवर्षी मोठी आर्थिक उलाढाल होणाऱ्या शहरातील सुवर्ण बाजारपेठेत यंदा अपेक्षित तेजी दिसून आली नाही. दुष्काळी परिस्थिती, खरीप हंगामातील पिकांचे घटलेले उत्पादन आणि सोन्या-चांदीच्या वाढलेल्या किमतींचा परिणाम बाजारपेठेवर झाला. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी साधारणतः 10 ते 12 कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र, यंदा दरात घसरण होऊनही सामान्य ग्राहकांनी दागिने खरेदीकडे पाठ फिरवल्याने उलाढालीत सुमारे 15 टक्क्यांनी घट झाल्याचा अंदाज सुवर्ण व्यवसायातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Jalgaon Crime : जळगावात किरकोळ वादातून चाकूहल्ला; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खेडी शिवारातील माऊलीनगर परिसरात नवरात्रोत्सवानिमित्त गरबा-दांडिया पाहण्यासाठी बसलेल्या महिलांजवळ वाहनाचा प्रखर लाईट पडल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान रक्तरंजित घटनेत झाले. या वादात चाकूने वार करण्यात आल्याने किरण विठ्ठल पाटील यांचा जागीच मृत्यू झाला, तर किशोर छगन पाटील हे गंभीर जखमी झाले. ही घटना घडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. एमआयडीसी पोलिसांनी काही तासांत दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

तुळजाभवानी मंदिरात परिसरात हाणामारीची घटना

तुळजाभवानी मंदिराच्या परिसरात नगरचे आणि स्थानिकांचे पुजारी यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. हा सर्व प्रकार बंदोबस्तावर असलेले पोलीस आणि खासगी सुरक्षा रक्षकांच्या समोर घडला, मात्र सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Pune : मुळशी तालुक्यातील कोंढावळे येथील हॉटेलमध्ये तोडफोड

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील कोंढावळे येथील एका हॉटेलमध्ये तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. रात्री हॉटेल बंद करण्याची वेळ झाल्याने जेवणासाठी आलेल्या तरुणांना कर्मचाऱ्यांनी हॉटेल बंद झाल्याचे सांगितले. त्यामुळे जेवण न मिळाल्याच्या रागातून तरुणांनी हॉटेलमध्ये तोडफोड केल्याची माहिती आहे. रात्रीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात चर्चा सुरू झाली आहे. हॉटेलची वेळ संपल्यानंतर जेवण देण्यास नकार दिल्याने हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेबाबत अधिक तपशील आणि संबंधितांवर झालेल्या कारवाईची माहिती अद्याप उपलब्ध नाही.

पुणे- बंगळुरू महामार्गावर अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

साताऱ्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली. अंबाबाईच्या दर्शनावरून परत येत असताना भाविकांवर काळाने घाला घातला. भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामध्ये मृत्यू झालेले चौघेही जिवलग मित्र आणि एकाच गावातील होते.हा अपघात कराड शहराजवळ पुणे- बंगळुरू महामार्गावर झाला.

टायगर श्रॉफवर गोळीबार प्रकरणातील शूटर्सच्या निशाण्यावर होता सलमान खान

टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तीन संशयित हल्लेखोरांनी सुरुवातीला अभिनेता सलमान खानला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सलमान खानच्या घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त असल्याचे पाहून त्यांनी हा प्लॅन बदलल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर टायगर श्रॉफ जुहू येथील फुटबॉल मैदानावर नियमितपणे जात असल्याची माहिती त्यांना मिळाली. तसेच, तेथे सुरक्षा व्यवस्था तुलनेने कमी असल्याचे लक्षात आल्यानंतर हल्लेखोरांनी टायगर श्रॉफला लक्ष्य केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात दोन महिलांसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. गोळीबारासाठी वापरण्यात आलेल्या शस्त्रांचा पुरवठा कोणी केला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. शस्त्र पुरवठ्याच्या संपूर्ण साखळीचा उलगडा करण्याचा प्रयत्न तपास यंत्रणा करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT