Abdul Sattar
Abdul Sattar Sarkarnama
महाराष्ट्र

Abdul Sattar SC Hearing : एकीकडे १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार तर सत्तार बिर्याणी खायला हैद्राबादला...

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ आज (दि.११) निकाल देणार आहेत. हा निकाल फक्त शिवसेनेसाठीच महत्त्वाचा नाही, तर या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होणार आहे. याचवेळी न्यायालयाच्या निकालाआधी ठाकरे गट व शिंदे गटाचं टेन्शन वाढलं आहे. मात्र ,याचवेळी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाष्य केलंय. आमची बाजू सत्याची आहे आणि निकाल आमच्या बाजूने लागेल, आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. विजय आमचाच असेल असं सत्तार म्हणाले आहेत.

अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधी मोठं भाष्य केलं आहे. सत्तार म्हणाले, भीतीचं काही कारण नाही, ज्यावेळी कुणीही युध्दभूमीवर उतरतो. त्यावेळी जय पराजय दोन्हींना समोर ठेवूनच निर्णय़ घ्यावे लागतात. एकनाथ शिंदेंनी जो काही निर्णय घेतलाय तो ४० आमदार, १० अपक्ष आमदार आणि १३ खासदार यांच्यासह लाखो कार्यकर्त्यांचा विश्वास त्यांच्यावर आहे. आणि याचाच सन्मान ठेवून न्यायालय आमच्या बाजूने निर्णय देणार आहेत. कारण नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे देखील आमच्या बाजूने आहेत. त्यामुळे न्यायालय कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय देईल असं सत्तार म्हणाले.

निवडणूक आयोगानं जो काही शिवसेना(Shivsena) पक्षनाव आणि चिन्हाबाबत निर्णय दिला आहे. त्यावर त्यात चिन्ह, नाव शिंदेगटाला दिला. आहे. आणि पक्षाचे प्रमुखही शिंदेच आहे. त्यामुळे न्यायालयानं कोणताही निर्णय दिला तरी तो निकाल आमच्याच बाजूने लागणार आहे. त्यामुळे मला टेन्शन नाही. मी बिर्याणी खायला हैद्राबादला चाललोय असं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.

राहुल नार्वेकर यांचा दौरा पूर्वनियोजित होता. त्याचा आणि निकालाचा तसा काही संबंध नाही, असं सत्तार म्हणालेत. शिवाय कार्यकर्त्यांना ऐवढंच सांगेन की निश्चित राहा असंही ते म्हणालेत.संजय राऊत ला काय ट्विट करायचे ते करू द्या. त्यांच्या ट्वीटला आता काहीही महत्व नाही. सर्वोच्च न्यायलय जो ही निकाल देईल तो मान्य असेलॉ, असं अब्दुल सत्तार म्हणाले.आम्ही सेनेत होतो तेव्हा आम्ही वाघ होतो आणि पक्ष सोडला की रेडे? रेडे पण आपली भूमिका बजावतात, असं म्हणत सत्तार यांनी ठाकरे गटाच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

दरम्यान जयंत पाटील(Jayant Patil) यांना आज ईडीची नोटीस आली आहे. त्यावरही सत्तार बोललेत. जयंत पाटील हे चांगले नेते आहेत. पण नोटीस मिळाली असेल तर कारवाई व्हायला हवी, असं मत सत्तारांनी व्यक्त केली.

जयंत पाटील यांना आलेल्या ईडीच्या नोटीसवर आणि सत्तासंघर्षाच्या निकालावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अध्यक्ष परदेशात, जयंत पाटलांना ED नोटिस यावरून निर्णय या सरकार विरोधात येण्याची दाट शक्यता? निर्णय खरच जर आताच्या सरकार विरुद्ध आला, तर मात्र कोर्टाचे निकाल, आधी कसा leak झाला, ह्यावर कोर्टालाच गांभीर्याने विचार करावा लागेल असं ते म्हणाले आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT