Abhijeet Dipke.jpg Sarkarnama
महाराष्ट्र

Abhijeet Dipke : अभिजीत दीपके दिल्ली पोलिसांच्या ताब्यात, हिंगोलीत आजीचे निधन!

Abhijeet Dipke Grandmother : मागील काही महिन्यांपासून आजारी असलेल्या अभिजीत दीपके यांच्या आजीचे निधन झाले. अभिजीत हे दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहेत.

Roshan More

Abhijeet Dipke News : अभिजीत दीपके यांना दिल्ली विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतले. ते आंदोलन करण्यासाठी दिल्लीला गेले होते. त्यांना पोलिसांनी गुरुग्राम येथे नेल्याची माहिती आहे. दरम्यान, या सगळ्या घडामोडीमध्ये दीपकेंना महाराष्ट्रातून दुखःद बातमी मिळाली आहे.

अभिजीत यांच्या आजीचे आज सकाळी निधन झाले. अभिजीत दीपकेंचे वडीलांच्या आई या संतुक पिंपरी या हिंगोलीमधील गावी राहत होत्या. त्या गेल्या काही महिन्यापांसून आजार होत्या. दरम्यान, आज त्यांचे निधन झाले. दीपके परिवार हे संभाजीनगरवरून गावी रवाना झाला आहे.

आज सकाळी मुंबईहून अभिजीत दीपके, अशितोष रांका, सौरभ दास हे दिल्लीला रवाना झाला होते. पोलिसांनी विमान दिल्ली विमानतळावर लँड होताच विमानत जात तिघांना ताब्यात घेतले. दीपके हे आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी आपल्या सहकाऱ्यांसोबत जंतर मंतर येथे आंदोलन करणार होते.

पोलिस विमानात आल्यानंतर दीपके यांनी सोशल मीडियावर लाईव्ह करत मला अटक करा, मी अटक करून घेण्यासाठीच आलो आहे. त्यावर पोलिसांनी आम्ही तुम्हाला अटक करत नाही, कृपया सहकार्य करा असे म्हणत ताब्यात घेतले.

दीपके यांच्या सोबत त्यांचे सहकारी अशितोष रांका, सौरभ दास हे देखील त्यांच्यासोबत होते. पोलिसांनी अजून दीपके यांना कोठे घेऊन जाणार आहे, याची माहिती दिली नाही. तसेच तो अजुनही विमानतळावरच आहेत. दीपके यांच्यासोबत रांका आणि दास यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी अभिजीत दीपके यांना पुन्हा मुंबईत जाण्यास सांगितले. मात्र, त्यांनी नकार देत आपण आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका मांडली. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे सांगत पोलिसांन त्यांना पुन्हा मुंबईला जाण्यास सांगत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT