Nilkantheshwar sugar factory; Ausa MLA Abhimanyu Pawar and Devendra Fadnavis sarkarnama
महाराष्ट्र

Abhimanyu Pawar : CM फडणवीसांकडून लाडक्या आमदाराला मोठं गिफ्ट, सहकार अन् वित्त विभागाच्या विरोधानंतरही 18 कोटींच्या कर्जाला मंजुरी!

Cabinet Approves Loan Nilkantheshwar Sugar Factory : कारखाना काही वर्ष बंद असल्याने एनसीडीसीच्या कर्जासाठीच्या निकषात बसत नसल्याचे सांगत सहकार आणि वित्त विभागाने कारखान्यास शासन हमीवर कर्ज देण्यास नकार दिला होता.

Roshan More

BJP Politics : 15 वर्ष बंद पडलेला किल्लारीतील नीळकंठेश्वर कारखान्याला मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार अभिमन्यू पवार यांना या कारखान्यासाठी मंत्रिमंडळातून कर्ज मंजुरी मिळवण्यात यश आले आहे. कर्ज मंजुरीच्या प्रस्तावाला सहकार अन् वित्त खात्याची परवानगी नसताना मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. कारखान्याला राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून 18 कोटींचे कर्ज घेण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्याचे पुढे आले आहे.

मराठवाड्यातील इतर कारखाने कर्ज मंजूरीच्या प्रस्तावाला मान्यता मिळावी यासाठी झगडत असताना 15 वर्षापासून बंद असलेल्या नीळकंठेश्वर कारखान्याला मात्र सहकार विभागाचा विरोध असताना कर्ज घेण्यासाठी मंजूरी कशी? असा प्रश्न आता अभिमन्यू पवार यांचे विरोधक आणि मंत्रिमंडळातील काही मंत्री देखील विचारू लागले आहेत.

खुद्द सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनाही हा निर्णय पटलेला नाही. परंतु हा मंत्रिमंडळाचा अधिकार आहे, असे म्हणत त्यांनी यावर अधिक भाष्य करणे टाळले अभिमन्यू पवार यांनी 2019 पासून औसा मतदार संघ आणि लातूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नीळकंठेश्वर साखर कारखाना सुरू करणार असे आश्वासन देत होते. तो शब्द त्यांनी खरा करून दाखवला. तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मिळालेल्या पाठबळामुळे.

सरकारने यापूर्वी देखील गाळप क्षमता दुप्पट करण्यासाठी 18 कोटींचे शेअर कॅपिटल कारखान्याला दिले होते. आता पुन्हा एकदा राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून भांडवली खर्च व खेळत्या भांडवलासाठी 25 कोटी रुपयांचे कर्ज मिळण्याबाबतचा प्रस्ताव कारखान्याने साखर आयुक्तांना दिला होता.

निगेटीव्ह शेरा तरी..

कारखाना काही वर्ष बंद असल्याने एनसीडीसीच्या कर्जासाठीच्या निकषात बसत नसल्याचे सांगत सहकार आणि वित्त विभागाने कारखान्यास शासन हमीवर कर्ज देण्यास, तसेच त्याबाबतचा प्रस्ताव एनसीडीसीलला पाठवायला विरोध केला होता, अशी देखील चर्चा आहे. अर्थ, सहकार खात्याने कर्ज प्रस्तावावर निगेटिव्ह शेरा दिला होता, हे सहकार मंत्र्यांनीच कबुल केले. मात्र कर्ज कुणाला द्यायचे आणि कुणाला नाही? हा सर्वस्वी निर्णय मंत्रिमंडळाचा आहे असे सांगत त्यांनी या निर्णयाला संमती दिली.

पक्षांतर्गत विरोधकांवर मात

कारखान्याला कर्ज मंजुर झाल्याने जिल्ह्याच्या राजकारणात माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, विधान परिषदेचे आमदार बसवराज पाटील, लातूर ग्रामीणचे रमेशअप्पा कराड या सगळ्यांवर अभिमन्यू पवार यांनी मात केल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT