शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने (Shivsena UBT) यावरून केंद्रातील मोदी सरकार विरोधात रस्त्यावर उतरत त्यांच्या देश भक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.'माझं कुंकू, माझा देश' असे म्हणत भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याला कडाडून विरोध दर्शवला आहे. पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात एक्सवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत 'बीसीसीआय' अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला उद्देशून काही प्रश्न विचारले आहेत.
आजही या सामन्यावर बहिष्कार टाकता येतो, पैशाच्या लोभाने भारत आपला स्वाभिमान गहाण ठेवत नाही, हे बीसीसीआय आपल्या कृतीतून दाखवून शकतो. पैशापेक्षा देशाचा स्वाभिमान महत्वाचा आहे, आम्ही देशद्रोही नाही हे दाखवण्याचे धाडसही आजच्या सामन्यावर बहिष्कार टाकून भारतीय नियामक मंडळ दाखवू शकते. जगातील सर्वोत्तम संघासाठी दोन गुण खरोखर इतके महत्त्वाचे आहेत का? असा प्रश्न आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी उपस्थित केला आहे.
याबरोबरच पाकिस्तान विरुद्ध क्रिकेटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार्या खेळाडूंना उद्देशूनही त्यांनी खडेबोल सुनावले आहेत. आज मैदानावर खेळणाऱ्यांनीही हे लक्षात घेतलं पाहिजे, की ते अशा देशाविरुद्ध खेळत आहेत जिथून दहशतवादी आपल्या देशात आले आणि निष्पाप लोकांचा बळी घेतला. पहलगाममध्ये ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांचा विचार करा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी भारतीय खेळाडूंनाही केले आहे.
दहशतवाद्यांना आश्रय देणार्या देशावर बहिष्कार टाकण्या पलीकडे काहीही असू शकत नाही, हे सर्व जाणून घेऊनही खेळ सुरू ठेवणे किती लाजिरवाणे आहे? असा संतापही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. आज आपल्याला अशा केंद्र सरकारची आठवण येते जी अशा देशद्रोही कृत्यांवर कठोर शब्दात टीका करेल. दुर्दैवाने आपल्याला भाजपाने आपली विचारसरणी देश भक्तीची व्याख्या बदललेली दिसते, असा टीकाही आदित्य ठाकरे यांनी मोदी सरकारवर केली.
तर दुसरीकडे दुबईत आज रात्री 8 वाजता खेळविल्या जाणाऱ्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला विरोध करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला शिंदे यांच्या पक्षाच्या महिला नेत्या ज्योती वाघमारे यांनी आव्हान दिले आहे. हिमंत असेल तर दुबईत जाऊन खेळपट्टी उखडून दाखवा, अशा शब्दात वाघमारे यांनी ठाकरेंना डिवचले आहे. या क्रिकेट सामन्यावरून दोन्ही शिवसेनेमध्ये जुंपल्याचे चित्र आहे.
FAQ
1. आदित्य ठाकरे यांनी पाकिस्तान विरुद्ध क्रिकेटबद्दल काय म्हटले?
त्यांनी ते लाजिरवाणे असल्याचे सांगत खेळाडूंना बहिष्काराचे आवाहन केले.
2. ठाकरे यांनी पाकिस्तान सामन्यांचा बहिष्कार का मागितला?
त्यांच्या मते पाकिस्तानविरुद्ध खेळणे हे जनभावना व राष्ट्रीय अभिमानाच्या विरोधात आहे.
3. यामुळे भारत-पाकिस्तान क्रिकेट संबंधांवर कसा परिणाम होईल?
यामुळे राजकीय दबाव वाढून क्रिकेट संबंध तोडण्याच्या मागण्या जोर धरतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.