Aditya Thackeray Letter to devendra Fadnavis  sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics: हाॅटेलमध्ये आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची भेट? सत्य काय ते समोर आलं; स्वतः फडणवीस म्हणाले, 'आम्ही समोरासमोर...'

Aditya Thackeray Devendra Fadnavis : मित्रांसोबत डिनरचा प्लॅन असल्याने आपण हाॅटेलमध्ये गेले होतो, असे आदित्य ठाकरेंनी सांगितले तसेच फडणवीसांसोबत भेट झाली नसल्याचे स्पष्ट केले.

Roshan More

Aditya Thackeray Meet Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार आदित्य ठाकरे यांची साॅफिटेल हाॅटेलमध्ये भेट झाल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. सभागृहामध्ये फडणवीस यांनी थेट ठाकरेंना इकडे येण्याची ऑफर दिली होती. त्यामुळे त्यापार्श्वभूमीवर ही भेट झाली का? याची चर्चा सुरू झाल्या. मात्र, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांन स्पष्टिकरण देत भेट झाली नसल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस आणि आदित्य ठाकरे एकाच हाॅटेलमध्ये आले असल्याने त्यांच्या भेटीची अफवा सुरू झाली. मात्र, स्वतः फडणवीसा यांनी सांगितले की, 'मुंबईतील साॅफिटेल हाॅटेलमध्ये आदित्य ठाकरेंसोबत कुठलीही भेट झाली नाही किंवा आम्ही समोरासमोर देखील आलो नाही.'

आदित्य ठाकरे यांनी देखील फडणवीसांसोबत भेट ही केवळ अफवाच असल्याचे सांगितले. मित्रांसोबत डिनरचा प्लॅन असल्याने आपण हाॅटेलमध्ये गेले होतो, असे स्पष्ट केले. आदित्य यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता टोला लगावला. ते म्हणाले की, आमची भेट झाली नाही मात्र भेटीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या बातम्या वाचून एक माणूस रुसून गावाला जाईल.

ठाकरे बंधू एकत्र आले तर प्रोब्लेम?

मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांची भेट ही अफवा असल्याचे समोर येत असतानाच उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतमध्ये राज आणि ते एकत्र येण्याबाबत विचार व्यक्त केले. ते म्हणाले, राज आणि मी थेट चर्चा केली तर अडचण काय आहे कोणाला. मी आता त्याला फोन करू शकतो. तो मला फोन करू शकतो. बाकीचे लोक एकमेकांना भेटतात. आम्ही लोकांसारखे चोरून मारून भेटत नाही. ठाकरे आहोत जे करायचे ते उघडपणे करतो. आम्ही एकत्र आलो तर कुणाला प्रोब्लम आहे का? प्रोब्लेम असतील ते बघतील आपण का विचार करायचा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT