Pune News : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले आहे. सरकारच्या विरोधात काढण्यात आलेला मनोज जरांगे-पाटलांच्या मोर्चाचा बुधवारी पाचवा दिवस आहे. मोर्चा पुण्यात दाखल झालेला आहे. पुण्यातून मोर्चा मुंबईकडे कूच करण्याच्या तयारीत असताना हा मोर्चा मुंबईत येऊ नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कारण सांगत अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी मुंबई हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली आहे.
मनोज जरांगे व त्यांच्या समर्थकांवर आंदोलनप्रश्नी गुन्हा दाखल करावा, यासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेत सदावर्तेंनी याचिका दाखल केली आहे. याबाबत मनोज जरांगे-पाटलांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी 'सदावर्तेंना मी कसलीच किंमत देत नाही, त्यांना हवे ते त्यांनी करावे व मला हवे ते मी करणार,' असे सांगत मनोज जरांगेंनी त्यांचा विषयच संपवला.
मनोज जरांगे यांच्यासह मराठा आंदोलकांना मुंबईत येण्यापासून रोखा, अशी फौजदारी रीट याचिका सदावर्ते यांनी हायकोर्टात दाखल केली होती. या याचिकेवर बुधवारी दुपारी मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाचं काय होणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
"मनोज जरांगे-पाटील सरकारला वेठीस धरत असून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करा," अशी याचिका गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात (Mumbai high court) दाखल केली आहे. मराठा आंदोलक मुंबईत आल्यास राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा आरोपही गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या याचिकेतून केला आहे.
R...