Bipasha Basu Praised Tukaram Mundhe : राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे हे आपल्या धडाकेबाज कारवयांमुळं सध्या प्रचंड चर्चेचा विषय बनले आहेत. नुकतंच अभिनेत्री प्रिती झिंटा हिनं तुकाराम मुंढे यांच्या नावाचं टीशर्ट घालून 'हीच खऱ्या हिरोंना सेलिब्रेट करण्याची वेळ असल्याचं' म्हटलं होतं. त्यानंतर आता अभिनेत्री बिपाशा बासू यांनी देखील तुकाराम मुंढे यांच्या कामाचं कौतुक करताना त्यांना आणखी एका कारवाईसाठी साकडं घातलं आहे.
बिपाशा बासू हीनं एक व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला असून या व्हिडिओनुसार, तिनं नुकत्याच खरेदी केलेल्या एका न्युट्रिशन प्रॉडक्टच्या नव्या कोऱ्या डब्यात अळ्या आढळून आल्यानं ती अक्षरशः हादरली. यानंतर तिनं याची थेट तुकाराम मुंढेंकडं तक्रार केली. "आता केवळ तुमचाच आशा आहे" अशा शब्दांत तिनं तुकाराम मुंढेंच्या कामाचं एक प्रकारे कौतुक करतानाच त्यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी असं सुचवलं आहे.
दरम्यान, कालच अभिनेत्री प्रिती झिंटानं एका कार्यक्रमात खास टीशर्ट परिधान केला होता. या टीशर्टमुळं ती पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली. या टीशर्टवर टीम तुकाराम मुंढे असं लिहिलेलं होतं. त्याचबरोबर तिनं पापाराझींना फोटोसाठी पोझ देताना तुकाराम मुंढे यांनी सुरु केलेल्या अन्न सुरक्षेसाठीच्या कारवायांचं तोंडभरुन कौतुक केलं. या खऱ्या हिरोंसाठी सिलेब्रेशनची हीच वेळ असल्याचं तिनं म्हटलं. त्याचबरोबर तुकाराम मुढे नाव असलेला टीशर्ट तिनं अभिमानं मिरवला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.