Mahahrashtra News: गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून हिंदू जनआक्रोश मोर्चे काढले जात आहेत. त्यातील हिंदुत्ववादी नेते आणि भाजपा नेत्यांच्या हेट स्पीच प्रकरणांवर कोणतीही कारवाई होत नसल्यानं सर्वोच्च न्यायालयानं शिंदे फडणवीस सरकारवर कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहे.
यानंतर राजकीय विरोधी पक्षातील नेतेमंडळींकडूनही सरकारवर आगपाखड करण्यात येत आहे. आता ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी देखील खोचक टि्वटद्वारे निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात जनआक्रोश मोर्चांमध्ये अल्पसंख्यांकांविरोधात धार्मिक भावना भडकावणारी वक्तव्ये होत असल्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर बुधवारी (दि.२९) सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांनी महाराष्ट्र सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त खडेबोल सुनावले होते. आता याचवरुन ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनीही एक टि्वट करत भाजपला टोला लगावला आहे.
काही राजकारण द्वेषावर आधारित आहे असा उल्लेख करत सिब्बल म्हणाले, 'चंद्र मागताय पण, लक्षात ठेवा अडवाणीजींची रथयात्रा, आरएसएस प्रमुखांच्या "शमशान-कबरीस्तान टिप्पण्या (2018), गोली मारो सालों…(२०२०) भाषण इत्यादी... अशा शब्दांत भाजपवर हल्लाबोल केला आहे. सिब्बल यांच्या टि्वटला भाजपकडून काय प्रत्युत्तर दिले जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सर्वोच्च न्यायालय नेमकं काय म्हणालं?
महाराष्ट्रात जनआक्रोश मोर्चांमध्ये अल्पसंख्यांकांविरोधात धार्मिक भावना भडकावणारी वक्तव्ये होत असताना राज्य सरकार त्यावर का नियंत्रण ठेवू शकत नाहीये असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं उपस्थित केला आहे. यावेळी न्यायमूर्ती के. एम. जोसेफ म्हणाले, महाराष्ट्रातील सरकार षंढ असल्यामुळं ते काहीच करत नाहीय. त्यामुळंच हे सगळं काही महाराष्ट्रात होत आहे. ज्यावेळी धर्म आणि राजकारण हे तेव्हा या गोष्टी थांबतील. त्यामुळं राजकारण्यांनी धर्म आणि राजकारण वेगळं करायला हवं असंही न्यायमूर्ती जोसेफ यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.