Maharashtra Farmer Loan Waiver; cm devendra fadnavis And Dattatray Bharne sarkarnama
महाराष्ट्र

Farmer Loan Waiver : राज्यातील लाखो कर्जबाजारी शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची मोठी घोषणा; थेट कर्जमाफीची तारीखच सांगितली!

Dattatray Bharne Announces Farmers Loan Waiver Date : राज्यातील लाखो कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी केली असून कर्जमाफीची अंमलबजावणी होणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

Aslam Shanedivan

Maharashtra Farmer Loan Waiver Latest News : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडताना राज्यातील लाखो कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी कर्जमाफीचा उल्लेख करत शेतकऱ्यांचं दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ केलं जाईल, असं जाहीर केलं होतं. तसेच या कर्जमाफीला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ असे नाव ही देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आलं होतं.

पण यानंतर तीन महिने होत असतानाही राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठीची पक्की तारीख सांगितली नाही. फक्त ३० जूनपूर्वी केली जाईल असे सांगितले जात होते. याबाबत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील घोषणा केली होती. आता त्यांनी शेतकऱ्यांसाठी बहुप्रतीक्षित असणाऱ्या कर्जमाफीची तारीखच सांगितली आहे. यामुळे चिंता वाढलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. भरणे यांनी आज (३१ मे) शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात अहिल्यानगर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात घोषणा केली. त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची थेट तारीख सांगत ती येत्या दहा दिवसांत केली जाईल असे म्हटले आहे.

अतिवृष्टी, महापूर, दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि सततच्या नैसर्गिक संकटांसह शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने राज्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातच राज्य सरकारने घोषणा केलेली कर्जमाफी देखील वेळेत होत नसल्याने कर्जमाफी नेमकी कधी होणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. त्यातच विरोधकांनीही राज्य सरकारला याच प्रश्नावरून धारेवर धरलं होतं.

दरम्यान आता राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत माहिती दिली आहे. भरणे यांनी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर केलेली आहे. ती येणाऱ्या ८ ते १० दिवसांत केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची परवानगी घेऊन आपण ही घोषणा करत असल्याचेही भरणे यावेळी म्हणाले.

तसेच भरणे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करत, त्यांच्या नावाने ही कर्जमाफी योजना राबविण्यात येत असून तरुण आणि मेंढपाळ समाजासाठीही भविष्यात विविध कल्याणकारी योजना आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT