"अमित शाह शिवसेना प्रमुखांचा आणि शिवसेनेचा अपमान करत आहेत. शिंदेंना उल्लेख करणं म्हणजे त्यांनी हा मराठी माणसाचा अपमान केला आहे. एकनाथ शिंदे ही अमित शाह यांची टेस्टट्यूब बेबी आहे. या बेबीला 4 वर्ष झाली आहेत. शाह सुप्रीम कोर्टाचे प्रमुख झाले आहेत का? तुमच्या दबावामुळे सुप्रीम कोर्ट निर्णय देत नाही. त्यांच्या दबावामुळेच पक्षाचे चिन्ह आणि नाव निवडणूक आयोगाने शिंदेना दिलं आहे. अमित शाहांच्या पोटातलं विष ओठावर आलं. शिवसेना प्रमुखांची जागा घेण्याची प्रेरणा अमित शाह यांनी एकनाथ शिंदेंना दिली आहे, अशा शब्दात संजय राऊतांनी अमित शहांच्या कालच्या वक्तव्यावरून हल्लाबोल केला आहे.
ओमराजे ज्यांच्या उपयोगी पडलाय तो माणूस घरातल्या व्यक्तीचा उद्धार करेल असं वाटलं नव्हतं पण ते करण्यात आलं, ते मी सहन केलं. माझ्या कुटुंबानं तुमचं काय वाटोळं केलंय. माझ्या नुसत्या चर्चेनं मी तीन दिवसात वाईट होत असेल तर खरंच वाईट आहे, अशी प्रतिक्रिया ओम राजेनिंबाळकर यांनी दिली आहे.
दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलकडून होणारे सततचे हल्ले आणि आणि शांतता करारातील अटींचे सातत्याने उल्लंघन होत असल्याचा आरोप करत इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने पुन्हा एकदा होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्याची घोषणा केली आहे.
ओमराजे निंबाळकर आज धाराशिवला जाणार आहेत. यावेळी खबरदारीचा भाग म्हणून त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.
पुणे-बेंगलोर हायवेवर कोल्हापूरहून जेजुरीला जाणारी एक मिनी बस आणि एका ट्रकची धडक झाली. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून, पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे. त
बंडखोर तृणमूल काँग्रेसच्या आमदारांच्या तक्रारीनंतर, पक्षाच्या तीन बँक खात्यांमधून पैसे काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे, यामध्ये अंदाजे 440 कोटी रुपये आहेत. या कारवाईमुळे निवडणुकीतील पराभवानंतर ममता बॅनर्जींच्या टीएमसीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. बंडखोर पक्षाच्या आमदारांनी निधीच्या स्रोताची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
सातारा सांगली जिल्ह्यात कार्यक्षेत्र असणाऱ्या कराडच्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. 153 केंद्रावर मतदान होणार आहे. सहकार व संस्थापक पॅनेल मध्ये दुरंगी लढत होता आहे. कारखान्याचे 50 हजार च्या वर शेतकरी सभासद आहेत. या निवडणुकीसाठी आमदार डॉ. अतुल भोसले यांनी मतदानाचा हक्क बजावला.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला हिंसक वळण लागले. संप यशस्वी करण्यासाठी काही आंदोलकांनी रस्त्यावर धावणाऱ्या बसला लक्ष्य केले. त्यानंतर धारावी, दहिसर, बांगूरनगर, दादर आदी पोलिस ठाण्यांमध्ये याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. काही ठिकाणी बसच्या टायरमधील हवा काढण्याचे प्रकार घडले. तर, काही ठिकाणी दगडफेक करून बसच्या काचा फोडण्यात आल्या.
महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून मुंबई येथे सुरू होणार असून, यावेळी विधान भवन प्रवेशासाठी प्रथमच एकही प्रवेश पत्रिका छापण्यात येणार नसून माननीय पीठासीन अधिकारी, माननीय मुख्यमंत्री ते अधिकारी-कर्मचारी वर्ग, स्वीय सहायक, अभ्यागत अशा सर्वांसाठी विधान भवन ई-प्रवेश प्रणालीद्वारे "चेहरा पडताळणी पध्दती" अवलंबिण्यात येत आहे, अशी माहिती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे देण्यात आली.
नांदेड शहरातील वाघीरोड परीसरात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली. 35 वर्षीय शेख शमीम आपल्या काही मित्रासोबत एका दुकानासमोर बोलत बसला होता. तेव्हा दुचाकीवरुन आलेल्या चारी ते पाच अज्ञात तरुणांनी पत्ता विचारला. शेख शमीम त्यांना पत्ता सांगत्त असताना त्या युवकांनी तलवार आणि धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला केला. आरोपींनी गोळीबार केल्याची देखील माहिती आहे. या हल्ल्यात शेख शमीम यांचा मृत्यू झाला. खूनाचा कारण समजू शकले नाही , पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
दाढी फक्त वाघाला असते, आणि मला गर्व आहे कि माझा जन्म मराठी कुटुंबात झाला आहे. जैन आणि सनातन धर्मासाठी मी महाराष्ट्रभर फिरणार आहे. तुमच्या मनगटात जर दम असेल तर तुम्ही जा मुंब्रा, कल्याण, भिवंडीमध्ये. मात्र, तिथे तुम्ही जाऊ शकत नाही. मी सनातनी आहे आणि सनातनसाठीच लढणार. माझ्या समाजासाठी माझी आहुती गेली तरी मी माझ्या समाजासाठी लढत राहणार, असं म्हणत जैन मुनी निलेशचंद्रन यांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्त्युत्तर देत थेट आव्हान दिले आहे.
ऐन मृग नक्षत्रात पावसाने दडी मारल्याने धाराशिव जिल्ह्यावर पाणीटंचाईचे गंभीर संकट ओढावले आहे. जिल्ह्यात सध्या केवळ 30 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. जानेवारी महिन्यापासून दरमहा सरासरी 99 दशलक्ष घनमीटर पाण्याचा वापर होत असून सध्या विविध प्रकल्पांमध्ये एकूण केवळ 93 दलघमी पाणी शिल्लक राहिले आहे. जिल्ह्यातील 226 प्रकल्पांपैकी तब्बल 202 प्रकल्पांनी तळ गाठला असून केवळ 24 प्रकल्पांमध्ये 26 ते 50 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने शेतीसाठीचा पाणीउपसा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
मान्सूनबाबात दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईत मान्सूनच्या आगमनाची शक्यता आहे. 23 जूनपासुन मुंबईसह संपूर्ण कोकणात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्मिती होणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिली आहे. हवामान अभ्यासक के एस होसाळीकर यांनी देखील मान्सूनबाबत महत्वाची माहिती देताना, 22 ते 23 जूनपासून दक्षिण कोकण आणि महाराष्ट्रा लगतच्या भागात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता सांगितली. हवामानाच्या मॉडेल्सनुसार, आगामी दिवसात राज्यातील बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस जूनच्या अखरपर्यंत राहू शकतो, असे म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.