Anjali Damania accuses Ajit Pawar of attempting to hand over BMC’s ₹500-crore Govandi hospital to Terna Trust, triggering a fresh political controversy. Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar : अजितदादा 500 कोटींचा सरकारी दवाखाना मेव्हण्याला देणार? पद्मसिंह पाटलांशी संबंध जोडून दमानियांचे खळबळजनक आरोप

Ajit Pawar : अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केला आहे. गोवंडीतील बीएमसीच्या ५०० कोटींच्या रुग्णालयाला पीपीपी तत्वावर तेरणा ट्रस्टला देण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा केला असून वाद तीव्र झाला आहे.

सरकारनामा ब्युरो

- ओंकार गोरे

Ajit Pawar News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्यावर जमीन गैरव्यवहाराचे आरोप अद्याप ताजे आहेत, अशात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. मुंबईच्या गोवंडी भागात बांधलेले महापालिकेचे ५०० कोटी रुपयांचे रुग्णालय पीपीपी तत्वाने तेरणा ट्रस्टला देण्याचा घाट घातल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. तेरणा ही माजी मंत्री पद्मसिंह पाटलांची संस्था आहे, पद्मसिंह पाटील हे सुनेत्रा पवार यांचे भाऊ आहेत.

गोवंडी भागातील बांधण्यात आलेले शताब्दी रुग्णालय तेरणा टॅस्ट्रकडे देण्यात येणार असल्याचा उल्लेख निविदा दस्तऐवजांमध्ये आहे, असा संदर्भ देणारी एक बातमी टाईम्स ऑफ इंडियाने देखील प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे, या घोटाळ्याचे कनेक्शन थेट अजित पवारांच्या कुटुंबियांशी असल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

नेमका काय आहे हा घोटाळा, अंजली दमानिया यांनी काय आरोप केले आहेत?

मुंबई महापालिकेने गोवंडी भागात शताब्दी नावाचे रुग्णालय मागच्या ५ वर्षात बांधले. ज्यामध्ये ५८० खाटा असतील, ज्यासाठी ५०१ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. हे रुग्णालय पीपीपी तत्वावर देण्याचे ठरले, म्हणजे ज्याला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणतो, ही राज्य सरकारची स्कीम आहे, यानुसार, ज्यावेळी टेंडर प्रक्रिया सुरू झाली, त्यावेळी तीन जणांनी बोली लावण्यात आली होती.

पण तांत्रिक अटी पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यामुळे त्यापैकी एका पक्षाची बोली नाकारण्यात आली. त्यानंतर तेलंगणा येथील सिद्धिपेटमधील सुरभी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस चालवणाऱ्या सुरभी एज्युकेशनल सोसायटी देखील हे शताब्दी रुग्णालयाचे संचालन करण्याची इच्छा दाखवली आहे.

परंतु, हे रुग्णालय चालवण्यासाठी इच्छा तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टने व्यक्त केली आहे, असे निविदा प्रक्रियेत नोंदवले आहे, या ट्रस्टचे प्रमुख हे पद्मसिंह पाटील आहेत. ते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे सख्खे भाऊ आहेत, शिवाय या ट्रस्टचे विश्वस्त आमदार रणजगजीतसिंह पाटील हे पवारांचे भाचे आणि भाजपचे तुळजापूरचे आमदार आहेत. या दोघांचा थेट अजित पवार यांच्याशी संबंध असल्याने घोटाळ्याचा आरोप चर्चेत आला आहे,

या रुग्णालयात असलेल्या ५८० खाटांपैकी फक्त २६४ खाटा बीएमसी रुग्णांसाठी राखीव असतील. निविदा दस्तऐवजांनुसार, बीएमसी रुग्ण म्हणजे मुंबई किंवा एमएमआर क्षेत्रात राहणारे, आणि महाराष्ट्र शासनाने जारी केलेले पिवळे किंवा केशरी राशनकार्डधारक, या सुविधांचा उपयोग घेवू शकणार आहेत. तर पुनर्वसित झोपडपट्टीवासीयांसाठी या रुग्णालयातील फक्त सुमारे १५० खाटा उपलब्ध असणार आहेत.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या आरोपांनुसार, पीपीपी कॉन्सेप्ट हाच फ्रॉड आहे, खासगीकरण करून ५०० कोटींचे हे हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांच्या नावावर करण्यात येत आहे, याच्याच जवळ RSS देखील एक हॉस्पिटल बांधत आहेत आणि हे तयार हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना बहाल केले जात आहे, असा आरोप दमानियांनी केला आहे.

या अगोदर अजित पवार यांच्यावर पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणावरून आरोप झाले होते. ज्यामध्ये पार्थ पवार यांचे नाव घेतले जात होते. आता मुंबईतील हॉस्पिटलवरून अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT