Deputy CM Ajit Pawar and CM Devendra Fadnavis amid political developments after Pune and PCMC election results. Sarkarnama
महाराष्ट्र

NCP Vs BJP : अजितदादांना भाजपवरची टीका महागात पडली? CM फडणवीसांनी पुणे-पिंपरी चिंचवडचा बदला रायगडमध्ये घेतला, भरत गोगावलेंना लॉटरी

NCP Vs BJP : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपवर टीका करणाऱ्या अजित पवारांना राजकीय फटका बसल्याचे चित्र असून, रायगड ध्वजवंदनाचा निर्णय चर्चेत आला आहे.

Hrishikesh Nalagune

NCP Vs BJP : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर केकेली टीका, भ्रष्टाचाराचे आरोप हे त्यांना अंगलट आल्याची चिन्हे आहेत. यंदा रायगडमध्ये शासकीय ध्वजवंदन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात करण्यात येणार असून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. अजित पवार यांनी केलेल्या राजकीय आरोपांमुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये वाद सुरु आहेत. त्यामुळे आदिती तटकरे यांना घोषित झालेले पालकमंत्रीपद स्थगित करण्यात आले. पालकमंत्रिपद स्थगित झाल्यानंतरही शासकीय ध्वजवंदनावरून शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू होती. गतवेळी प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्यदिनी आदिती तटकरे यांच्या हस्ते रायगडच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजवंदन पार पडले होते. मात्र, यंदा गोगावले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात येणार आहे.

राज्यात महायुती सरकारमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष आहेत. मात्र, अनेक जिल्ह्यांमध्ये या पक्षांतील नेत्यांमधून विस्तवही जात नाही. त्यामध्ये सातत्याने चर्चेत असलेले नेते म्हणजे भरत गोगावले आणि सुनील तटकरे. गोगावले सध्या मंत्री असून तटकरेंच्या कन्याही त्यांच्यासोबत मंत्रिमंडळात आहेत. रायगडच्या पालकमंत्रिपदावर शिवसेनेचे नेते गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तटकरे दोघांनीही दावा सांगितला आहे. त्यामुळे सरकारला वर्ष उलटून गेल्यानंतरही हा तिढा सुटलेला नाही.

स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन जवळ आला की या वादात पुन्हा ठिणगी पडते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये आतापर्यंत तटकरे यांनाच रायगड जिल्ह्यात ध्वजारोहणाचा मान मिळालेला आहे. याच मुद्द्यावरून गोगावले यांच्या मनातील खदखद अनेकदा समोर आली आहे. ती आजही आली. आमच्या हस्ते ध्वजारोहण व्हावे, ही जनतेची इच्छा असल्याचे ते म्हणाले होते. त्यानंतर काही तासांतच त्यांची ही इच्छा फडणवीस सरकारने पूर्ण केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT