Ajit Pawar Death in Plane Crash: महाराष्ट्रातील राजकारणात 'दादा'म्हणून ओळखले जाणाऱ्या अजित पवारांचे आज सकाळी बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झाले. 45 वर्षांच्या आपल्या राजकीय जीवनात अजितदादांनी अनेक महत्वाची पदे भूषवली.
सहकार क्षेत्र, जिल्हा बँक, आमदार, विरोधी पक्षनेता, अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री अशा विविध पदावर त्यांनी काम करुन आपल्या कामाची छाप उमटवली. सामान्य माणूस, विरोधक, कार्यकर्ते सगळ्यांची कामे करण्यात त्यांचा हातखंडा होता,
अजितदादांनी लोकसभा निवडणूक लढवली होती हे अनेकांनी माहीत नाही. अजित पवार आणि बारामती लोकसभा निवडणूक म्हटली की त्यांची खासदारकी आठवते. अजित दादा खासदार कसे झाले. हे जाणून घेऊया.. ते 10 व्या लोकसभेचे सदस्य होते.
अजित पवारांनी 1982 मध्ये राजकारणात प्रवेश केला. आज राज्याच्या राजकारणातील महत्त्वाच्या नेत्यांमध्ये अजितदादाचं नाव आदरानं घेतलं जाते. शिक्षण, सहकार, क्रीडा, कृषी अशा अनेक विभागांची मंत्री म्हणून जबाबदारी अजितदादांनी सक्षमपणे सांभाळली आहे.
अजित पवार यांनी 1991 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून लढवली होती. त्यांनी भाजपच्या उमेदवार प्रतिभा लोखंडे यांचा 3 लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता. अजित पवार यांना पहिल्या निवडणुकीत 4 लाख 37 हजार 293 मते मिळाली होती. लोखंडे यांना 1 लाख 1 हजार 30 मते मिळाली होती,
बारामती लोकसभा जिंकून अजितदादांनी संसदेत एन्ट्री केली. पण त्यांची खासदार म्हणून कारकीर्द फार काळ टिकली नाही. अजितदादांना काँग्रेसने खासदारकीचं तिकीट दिलं. सर्व उमेदवारांची अगोदर घोषणा झाली. ऐन शेवटच्या टप्प्यात अजितदादांना खासदारकीची तिकीट देण्यात आलं. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण आणि अजितदादा पवार हे निवडून आले. पुढे राजीव गांधी यांच्या हत्येनंतर पी.व्ही. नरसिंह राव यांच्याकडे देशाचे नेतृत्व आले. त्यांनी तातडीने शरद पवार यांना संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी दिली.
शरद पवार तेव्हा संसदेचे सदस्य नव्हते सहा महिन्यांमध्ये त्यांना सदस्य म्हणून निवडून येणे आवश्यक होते. यामुळे अजित पवारांनी शरद पवारांसाठी आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. शरद पवार हे बारामती लोकसभा मतदार संघातून निवडून आले. त्यानंतर अजित पवार यांनी बारामती विधानसभा लढवून महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री घेतली.
अजित पवार यांनी १९९१ मध्ये पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आणि ते १६ वर्षे या पदावर राहिले. सहकारी साखर कारखान्याच्या बोर्डावर १९८२ मध्ये जेव्हा त्यांची निवड झाली तेव्हा त्यांचा राजकारणामध्ये प्रवेश केला. पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून १९९१ मध्ये ते निवडून आले आणि ते १६ वर्षे या पदावर राहिले. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांची एन्ट्री झाली. त्यानंतर त्यांनी मागे वळून कधी पाहिले नाही.
सातत्याने 1991 पासून बारामती लोकसभा व विधानसभा मतदारसंघांमध्ये अजित पवार यांनी नेतृत्व केले. बारामतीसह राज्याच्या कायापालट करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरून दाखविले. अजित पवार व बारामतीकर समीकरण इतके अतूट होते की आजपर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये देशांमध्ये किंवा राज्यामध्ये कुठलीही लाट असली तरी अजित पवार हे मोठ्या मताधिक्याने विजयी होत असत .
बारामतीतून १९९५, १९९९, २००४, २००९ , २०१४, २०१९ आणि २०२४ असे सलगपणे ते निवडून आले होते. त्यांनी मंत्रिमंडळात कृषी आणि ऊर्जा राज्यमंत्री म्हणून काम केले. पाणी पुरवठा, नियोजन राज्यमंत्री, पाटबंधारे, फलोत्पादन, ग्रामीण विकास, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, पाटबंधारे मंत्री, तर राज्याचे अर्थमंत्री त्यांची कारकीर्द उल्लेखनीय राहिली आहे. अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाचा रेकॉर्ड केला. मात्र त्यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.