Parth Pawar Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar On Parth Pawar: अजितदादांची पार्थ पवार जमीन घोटाळ्याप्रकरणी पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'चार ते पाच महिन्यांपूर्वीच माझ्या कानावर...'

Parth Pawar News: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी हा घोटाळा पुण्यातला असून 1800 कोटींची जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीने अवघ्या 300 कोटींमध्ये खरेदी केल्याचा आरोप केला आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी हा घोटाळा पुण्यातला असून 1800 कोटींची जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीने अवघ्या 300 कोटींमध्ये खरेदी केल्याचा आरोप केला आहे. यासाठी अवघे 500 रुपये मुद्रांक शुल्क भरल्याचा दावा दानवेंनी केला. यावर आता याप्रकरणी आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याप्रकरणी योग्य ती चौकशीचे आदेश दिले आहेत. आता यानंतर याप्रकरणी एकीकडे आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच पार्थ पवार जमीन घोटाळा आरोपप्रकरणी रोखठोक भाष्य केलं.

अजित पवार म्हणाले, पार्थ पवार (Parth Pawar) जमीन प्रकरणाशी थेट अजित पवार म्हणून दुरान्वयानं पण संबंध नसल्याचं सांगितलं. चार ते पाच महिन्यांपूर्वीच माझ्या कानावर काही गोष्टी आल्या होत्या. पण नियमांत न बसणारं असं कोणतंही काम करायचं नाही असं सांगितलं होतं. कोणत्याही नियमांत न बसणाऱ्या कामाला माझा पाठिंबा नसेल हेही अजित पवारांनी यावेळी ठणकावलं.

तसेच मुख्यमंत्री फडणवीसांनी पार्थ पवार जमीन प्रकरणाची जरुर चौकशी करावी. तो त्यांचा अधिकार आहे. कोणत्याही चुकीच्या गोष्टी करु नका अशा स्पष्ट सूचना मी अधिकारी वर्गाला दिल्या होत्या. पण त्यानंतर परत काय झालं, ते काही मला माहित नाही. आता चॅनेलमध्ये या जमीन प्रकरणाबाबत बरंच काही सांगितलं जात असल्याचंही अजित पवार म्हणाले.

पण त्या प्रकरणाची इत्यंभूत माहिती नाही. त्यात काय डॉक्युमेंटस् आहेत, काय नाही, त्याला कोणी परवानगी दिली, कोणी नाही.पण मी आपल्याला एक नक्की सांगतो, माझ्या जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकासंदर्भामध्ये त्यांना फायदा होण्याकरिता कोणत्याही अधिकाऱ्याला मी फोन केलेला नाही, किंवा कधी सांगितलेलंही नाही.

उलट यानिमित्तानं मी उपमुख्यमंत्री म्हणून अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला एकच सांगेल की,जर कोणी माझ्या नावाचा वापर करुन काही चुकीचं करत असेल, नियमांत न बसणारं काम करत असेल, तर त्याला माझा पाठिंबा नसेल. मी कायद्याच्या आणि सरकारी नियमांच्या चौकटीत राहून काम करणारा कार्यकर्ता असल्याचंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतानाच या संपूर्ण प्रकरणाची तपासणी करण्यासाठी चौकशीचे आदेश दिले आहे. तसेच राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली याप्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले , ‘या प्रकरणाबाबत महसूल विभाग,आयजीआर, लँड रेकॉर्ड संदर्भातील माहिती मी माहिती मागवलेली आहे. सध्या या संदर्भातील योग्य ते चौकशीचे आदेश मी दिलेले आहेत. प्राथमिक स्तरावर जे मुद्दे समोर येत आहेत ते गंभीर आहेत. त्यामुळे त्यावर योग्य प्रकारची माहिती घेऊनच बोलले पाहिजे. .’ दरम्यान, पार्थ पवार यांनी या प्रकरणी बोलताना, ‘मी कोणतेही चुकीचे काम अथवा घोटाळा केलेला नसल्याचं सांगितलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT