Ajit Pawar  Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar ON Sinchan Scam: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; सिंचन गैरव्यवहार प्रकरणी अजितदादांचा मोठा खुलासा; 'ती' फाईल उघडली असती तर

Ajit Pawar Irrigation Scam: राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता १९९९ मध्ये होती, तेव्हा अजितदादा हे सिंचनमंत्री होते. सिंचन गैरव्यवहारातील आरोपाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की पुरंदर उपसा सिंचन योजनेसाठी ३१० कोटींची फाईल माझ्यासमोर आली होती.

Mangesh Mahale

Ajit Pawar Irrigation Scam: सिंचन गैरव्यवहार प्रकरणावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नेहमीच टीका होत असते. गेल्या अनेक वर्षांपासून अधून-मधून सिंचन गैरव्यवहाराचा (Sinchan Scam) विषय काढून विरोधक अजितदादांकडे संशयाने पाहत असतात. यावर अजितदादांनी पु्ण्यातील एका प्रचार सभेत खुलासा केला आहे.

इतक्या वर्षांनंतर हा विषयावर अजितदादांनी खुलासा केल्याने विरोधकांनी त्यांना पुन्हा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. यावरुन आता विरोधकांनी त्यांच्यावर घणाघात केला आहे. "ती फाईल उघडली असती तर हाहाकार माजला असता,' असं म्हणत अजितदादांनी जुन्या भ्रष्टाचारावर बोट ठेवले आहे.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता १९९९ मध्ये होती, तेव्हा अजितदादा हे सिंचनमंत्री होते. सिंचन गैरव्यवहारातील आरोपाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की पुरंदर उपसा सिंचन योजनेसाठी ३१० कोटींची फाईल माझ्यासमोर आली होती. या प्रकल्पाचा वास्तविक खर्च २०० कोटी असताना मागील युती सरकारने १०० कोटी रुपये 'पार्टी फंडा'साठी वाढवला होता, असा आरोप अजितदादांनी केला. या सिंचन प्रकल्पाची "ती फाईल उघडली असती तर हाहाकार माजला असता..' असे अजितदादा म्हणाले.

अजित पवार म्हणाले, "पुरंदर सिंचन प्रकल्पाची किंमत २०० कोटी रुपये असल्याचे संबधीत अधिकाऱ्याने कबुल केले आहे. १०० कोटी रुपये पार्टी फंडासाठी मागण्यात आले होते, असे त्या अधिकाऱ्यांने सांगितले. आम्ही अधिकाऱ्यांनी देखील त्यामध्ये आमचे १० कोटी वाढवले आणि प्रकल्पाची किंमत ३१० कोटी रुपये झाली. अजुनही ही फाईल माझ्याकडे आहे. ती जर काढली असती तर हाहाकार माजला असता. कारण माझ्याकडे पुरावे होते. त्या फाईलवर सह्या होत्या,"

अजितदादांच्या या खळबळजनक आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अजितदादांवर घणाघात केला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांना 25 वर्षानंतर आता याची आठवण झाली. पण माझ्या माहितीप्रमाणे 1999 ला मी जलसंपदा मंत्री होतो, त्यावेळी अशा स्वरूपाचा कुठला निर्णय झाला असावा की पार्टी फंडसाठी इस्टिमेट वाढवून घ्यावं किंवा पार्टी फंडसाठी अबाऊ टेंडर द्यावं, असं मला आठवत नाहीये. शिवाय असं होऊ देखील शकत नाही, असे खडसे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT