NCP leaders Rupali Patil Thombare and Amol Mitkari meeting Chief Minister Devendra Fadnavis regarding demands for a high-level inquiry into Ajit Pawar’s plane crash. Sarkarnama
महाराष्ट्र

NCP Leaders Meet CM : एकीकडे रोहित पवारांचे धक्कादायक खुलासे; दुसरीकडे रुपाली पाटील, अमोल मिटकरी CM फडणवीस यांच्या भेटीला

Ajit Pawar Plane Crash Related News :अजित पवार विमान अपघातावर रोहित पवारांच्या खुलास्यानंतर राष्ट्रवादी नेते रूपाली पाटील व अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेऊन उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशीची मागणी केली.

Sudesh Mitkar

Ajit Pawar Death News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्यानंतर राज्यातील विविध नेत्यांकडून या अपघाताबाबत काही शंका उपस्थित केल्या जात आहेत. या नेत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रूपाली पाटील ठोंबरे हे आघाडीवर होते.

मंगळवारी (ता.10) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत विमान अपघाताबाबत अनेक खुलासे केले आहेत. एकीकडे रोहित पवारांची खुलासे सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. फडणवीस यांनी देखील या मागण्यांवर गांभीर्याने दखल घेण्याचे आश्वासन त्यांना दिले असल्याचे सांगितले जात आहे.

या भेटीदरम्यान अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र दिले आहे. या पत्रामध्ये म्हटलं आहे की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत झालेल्या मृत्यूबाबत राज्यात तसेच जनतेमध्ये गंभीर स्वरूपाची चिंता व्यक्त होत आहे. सदर घटना अत्यंत गंभीर असून, त्यामागील कारणांबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने विविध शंका उपस्थित होत आहेत.

ही विमान दुर्घटना अपघाती स्वरूपाची आहे की यामागे कोणताही मानवी दोष, निष्काळजीपणा अथवा अन्य कारणे आहेत का, तसेच या घटनेच्या अनुषंगाने व्यक्त होत असलेला घातपाताचा संभ्रम दूर होण्यासाठी सदर प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी होणे महत्त्वाचे असून याबाबत स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी प्रस्तावित करण्यात यावी.

तसेच या अपघातास प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे जबाबदार असलेल्या दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी व तपासामध्ये सर्व शक्यता विचारात घेण्यात याव्यात, आपण यापूर्वी C.I.D. चौकशी लावली त्यातून सत्य परिस्थीती बाहेर येईल याबद्दल दुमत नाही. तसेच या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ आवश्यक कार्यवाही करावी, ही विनंती असल्याचं अमोल मिटकरी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT