NCP National President appointment : अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कधी विराजमान होणार, याची तारीख आता समोर आली आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी ही तारीख जाहीर केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार 26 फेब्रुवारीला विराजमान होतील, असे प्रफुल पटेल यांनी जाहीर केलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. यानंतर पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी आणि उपमुख्यमंत्रीपदावर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना विराजमान करण्यात आलं. सुनेत्रा पवार यांनी आता प्रशासकीय कारभार देखील सुरू केला आहे.
दरम्यान, पक्षाच्या अध्यक्षपदी प्रफुल पटेल विराजमान झाल्याचा भाजपकडून दावा करण्यात आला होता. भाजपचे (BJP) खासदार पियुष गोयल यांनी तसं एका खासगी वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. मराठमोळ्या पक्षाचा अध्यक्ष पटेल नसावा, असा घणाघात राज ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी केला होता.
पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांचे नाव पक्षाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत येताच, पटेल यांच्यासह पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना विरोधकांनी चांगलेच टार्गेट केलं होतं. प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषद घेत, आपल्याला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदामध्ये रस नसल्याचे स्पष्ट केलं. तसंच भाजपवर यावरून जोरदार टीका होताच, खासदार गोयल यांनी देखील राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत केलेलं आपलं विधान मागं घेतलं.
यानंतर प्रफुल पटेल भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जास्त संपर्कात दिसले. यानंतर वारंवार झालेल्या माध्यमांच्या मुलाखतीत प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार विराजमान होतील, हे ठामपणे सांगत राहिले.
आता तर सुनेत्रा पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी 26 फेब्रुवारीला विराजमान होणार असल्याचे प्रफुल पटेल यांनी स्वतः जाहीर केलं आहे. अजित दादाच्या निधनानंतर आम्हाला याच्यातून सावरायचे आहे. आम्हाला विलिगीकरणावर कोणतीही चर्चा करायची नाही. तसेच आमच्या पक्षाबाबत अनेक लोकांनी अनेक अफवा पसरवल्या आहेत. परंतु येणाऱ्या 26 तारखेला, विधिमंडळाची नेते, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहतील, असे प्रफुल पटेल यांनी गोंदिया इथं स्पष्ट केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.