Sunetra Pawar, New Deputy Chief Minister of Maharashtra: Sarkarnama
महाराष्ट्र

Sunetra Pawar News: धाराशिवची लेक झाली बारामतीच्या 'वहिनी'; समाजकारण ते उपमुख्यमंत्री; सुनेत्रा पवारांविषयी जाणून घ्या सर्वकाही

Sunetra Pawar, New Deputy Chief Minister of Maharashtra: अजितदादांनी राजकारणात एन्ट्री केल्यानंतरही सुरवातीचे काही वर्ष सुनेत्राताई या राजकारणापासून अलिप्त होत्या. अजित पवारांना त्या उद्योग-व्यवसायात मदत करत असत.

Mangesh Mahale

New Deputy Chief Minister of Maharashtra  Sunetra Pawar: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान सुनेत्रा पवार यांना मिळाला आहे. सुनेत्राताईंचा प्रवास हा समाजकारण ते उपमुख्यमंत्रीपद असा आहे. अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली आहे.

पूर्वीचा उस्मानाबाद म्हणजे सध्याच्या धाराशिव जिल्ह्यातील डॉ. पद्मसिंह पाटील हे शरद पवार यांचे राजकीय मित्र आहेत. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांनी पद्मसिंह पाटील यांची बहीण असलेल्या सुनेत्रा यांची सून म्हणून निवड केली होती. धाराशिवमधल्या तेरमध्ये सुनेत्रा पवारांचं बालपण गेले आहे.

राजकारणापासून अलिप्त

१९८५ मध्ये लग्नानंतर सुनेत्राताई या बारामतीला आल्या. त्यावेळी अजितदादा राजकारणात सक्रिय नव्हते, अजितदादांनी राजकारणात एन्ट्री केल्यानंतरही सुरवातीचे काही वर्ष सुनेत्राताई या राजकारणापासून अलिप्त होत्या. अजित पवारांना त्या उद्योग-व्यवसायात मदत करत असत.

सुनेत्राताईंनी काटेवाडीमधून (बारामती) आपल्या समाज कामाला सुरुवात केली. अजितदादा तेव्हा साताऱ्याचे पालकमंत्री होती. सातारा दौऱ्यात त्या अजितदादांसोबच होत्या. तेव्हा त्यांना महाबळेश्वर येथे सुरु असलेल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरु होते.

ग्रामीण जीवन अनुभवलं

या अभियानातून त्यांना प्रेरणा मिळाली. त्यांनी काटेवाडीत निर्मलग्राम आणि मग ग्राम स्वच्छता अभियान सुरु केले. बारामती परिसर टँकरमुक्त करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांचे बालपण धाराशिव जिल्ह्यातील तेर गावात गेल्याने त्यांनी लहानपणापासून ग्रामीण संस्कृती, ग्रामीण जीवन अनुभवलं आहे.

टेक्सटाईल पार्क

ग्रामीण परिसरातील स्थानिक महिलांच्या हाताला काम मिळावे, रोजगार मिळाला, या उद्देशाने त्यांनी बारामतीमध्ये टेक्सटाईल पार्क सुरु केले. त्यांच्याकडे या टेक्सटाईल पार्कची धुरा आहे. त्यासोबत त्या विद्या प्रतिष्ठानमध्येही सक्रिय आहेत.

'वहिनी'

राजकारणात नेहमीच व्यग्र असलेल्या अजितदादांसोबत असल्याने त्यांचा निवडणूक प्रचार आणि अन्य कामांमुळे राजकारणाशी संबध आहे. अजित पवार बारामती बाहेर असतील, तेव्हा परिसरातील विकासकामांकडे त्या लक्ष देते असत. बारामतीत जनसंपर्काची जबाबदारी सुनेत्राताईंकडे असायची. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांसह पक्षातील अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये त्या 'वहिनी' म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. पुढे बारामती परिसरात 'वहिनी' हीच त्यांची ओळख बनली.

उपमुख्यमंत्रीपद

कालांतराने अजितदादांच्या बारामतीच्या प्रचाराचे दौरे यांचे नियोजन त्या करीत असत. दौरे, गाव बैठका, लोकांच्या समस्या समजून घेणे, अशा जबाबदारी त्यांच्याकडे होती. सुनेत्रा पवार या प्रसिद्धीपासून दूर असत. कधीतरी त्या अजितदादांसोबत प्रचारादरम्यान दिसायच्या. 2024 ची लोकसभा निवडणुकही त्यांनी लढवली होती, मात्र यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्या राज्यसभेवर निवडून गेल्या. अजितदादा यांच्या अकाली निधनामुळे उपमुख्यमंत्रीपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. खासदारकीचा त्यांनी राजीनामा दिला आहे, सुनेत्रा पवार यांचे बारामतीतील सामाजिक कार्यात मोठे योगदान आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT