Ajit pawar, parth pawar  Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar : पार्थ पवारांच्या उमेदवारीबाबत अजित पवार यांचे मोठे विधान

Political News : मावळ, शिरूर लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवारांच्या उमेदवारीची चर्चा आहे.

Sachin Waghmare

Pimpri News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीतील जागावाटपावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीला महायुती एकत्रित सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट केले.

मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवारांच्या उमेदवारीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे विधान केले आहे. पार्थ पवार (parth pawar) यांच्या उमेदवारीबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असे सांगत येत्या काळात महायुतीचे जागावाटप लवकरच करू, असे यावेळी बोलताना अजित पवार (ajit pawar) यांनी स्पष्ट केले.

मावळ, शिरूर लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवारच्या उमेदवारीची चर्चा आहे. यावरून पत्रकारपरिषदेवेळी विचारणा केली असता त्यांनी पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असे स्पष्ट केले.

१२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार आहेत. यावेळी विविध विकासकामांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सध्या वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. निगडी येथे मेट्रो स्टेशन झाले आहे. त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे. त्यासोबतच पुण्यात मेट्रोची कामे वेगाने सुरू आहेत, शिवाजीनगरला जंक्शन होत आहे. त्याचा फायदा पुणे, पिंपरीतील प्रवाशांना होणार आहे.

येत्या काळात पुणे, पिंपरीचा वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्यात येत असून मेट्रोच्या कामामुळे दोन्ही शहरातील वाहतूककोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

(Edited by Sachin Waghmare)

R...

SCROLL FOR NEXT