Mahavikas Aghadi Sarkarnama
महाराष्ट्र

AIMPLB Support MVA : 'ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड'नेही महाविकास आघाडीला जाहीर केला पाठिंबा!

Mahavikas Aghadi News : याआधी 'उलेमा' बोर्डानेही अटींसह महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केलेला आहे

Mayur Ratnaparkhe

Maharashtra Vidhansabha Election : ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने (AIMPLB) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांना पाठिंबा देणाऱ्या विविध संघटनांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत.

या निर्णयामुळे महाविकास आघाडीला(Mahavikas Aghadi) मोठा राजकीय फायदा होण्याची शक्यता आहे. AIMPLBचे सदस्य मौलाना सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीच्या 269 उमेदवारांना समर्थन देत मुस्लिम समुदायाला आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, मराठा व इतर ओबीसी उमेदवारांसह 23 मुस्लिम उमेदवारांनाही समर्थन देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावरून भाजपने(BJP) महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजपने काँग्रेसवर दुहेरी भूमिकेचा आरोप करत म्हटले की, काँग्रेस ‘बंटोगे तो कटोगे’ सारख्या घोषणा देऊन द्वेषाच्या राजकारणाला विरोध करते, परंतु मुस्लिम संघटनांकडून मिळणाऱ्या अशा पाठिंब्याला मात्र विरोध करत नाही. याआधी उलेमा बोर्डानेही अटींसह महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता.

AIMPLB च्या पाठिंब्यामुळे मुस्लिम मतदार आघाडीच्या बाजूने एकत्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः अल्पसंख्याकबहुल भागांमध्ये याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. भाजप आणि महाविकास आघाडीत रंगलेली ही निवडणूक आणखी तीव्र होण्याची चिन्हे असून AIMPLB च्या भूमिकेमुळे निवडणुकीचा रंग अधिक गडद झाला आहे. महाराष्ट्रातील २८८ जागांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

ऑल इंडिया उलेमा बोर्डाने काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यासाठी काँग्रेसला उलेमा बोर्डाच्या तब्बल 17 अटी मान्य कराव्या लागल्या आहेत. ज्यावरून भाजपनेही काँग्रेससह महाविकास आघाडीला चांगलेच कोंडीत पकडले आहे. त

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT