Mumbai News : दोन वर्षांपूर्वी राज्यात शिवसेनेत मोठी फाटाफूट झाली. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी महायुतीचे सरकार स्थापन करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री हुडी घालून भेटीगाठी घेत होते, हे पुढे आले होते.
त्यानंतर एक वर्षांपूर्वी सत्तेत येण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दहावेळा बैठका झाल्या. त्यावेळी मी तोंड लपवून व तोंडाला मास्क लावून दिल्लीत अमित शहा यांची भेट घेत होतो, असे एका मुलाखती दरम्यान सांगितले. त्यानंतर विरोधी पक्षाकडून अजित पवार यांच्यावर टीका केली जात आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas danve) यांनी खोचक शब्दांत अजित पवारांवर निशाणा साधला आहे. (Ambadas Danve News)
सत्तेत सामील होण्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची अनेकवेळा भेट घेतली. या भेटेवेळी त्या बैठकीचे किस्से अजितदादांनी सांगितले. सत्तेत सामील होण्याआधी शाह यांच्यासोबत अनेकवेळा बैठकीला गेलो. या बैठकीला जाताना ते मास्क आणि टोपी घालून जात असल्याची कबुली त्यांनी दिली आहे.
यावर शिवसेना ठाकरे गटाचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले, अजित दादा यांच्यासारख्या परखड व्यक्तिमत्त्वाला जर तोंड लपवून जावे लागत असेल तर हे वाईट आहे. हा प्रकार म्हणजे स्वाभिमान गहाण ठेवण्यासारखा असल्याची टीका त्यांनी केली.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकरणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, प्रत्येक पक्ष आपली भुमिका ठरवत असतो. नारायण राणे यांना त्यांचा पक्ष किती किंमत देतो हे पाहावे लागणार आहे. त्यासोबाबतच येत्या काळात महायुतीमध्ये अजित पावर गट आणि आमच्या गद्दारांना किती जागा मिळणार याची उत्सुकता सर्वाना लागली आहे.
गेल्या काही दिवसाचा इतिहास पहिला तर भाजप आतापर्यंत कायम कूटनीतीचे राजकारण करत आली आहे. दरम्यान लव्ह जिहाद प्रकरणावरुन दानवे यांनी नितेश राणे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. माझे नितेश राणे यांना आव्हान आहे की असे प्रकार होत असतील तर त्यावर कारवाई करा. राज्यात आणि देशात तुमचे सरकार आहे. असे असताना कारवाई होत नसेल तर याचा अर्थ म्हणजे तुम्ही प्रोत्साहन देताय का? तुम्ही तुमच्या राज्यात यावर कारवाई करा, असेही दानवे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.