Shiv Sena UBT leader Ambadas Danve reacts strongly after ACB arrests FDA clerk in ₹35,000 bribery case at Mantralaya and seals Minister Narhari Zirwal’s office. Sarkarnama
महाराष्ट्र

Ambadas Danve : 35 हजारात इमान विकले जातेय; हे महाराष्ट्राचे दुर्दैव! 'ACB' ने आता फक्त फांद्या छाटू नयेत; बुंध्यावरच घाव घालावा!

ACB Action Mantralaya : मंत्रालयात 35 हजारांची लाच स्वीकारताना एफडीए लिपिक अटकेत. अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार टीका करत एसीबीने बुंध्यावर घाव घालावा, अशी मागणी केली. मंत्री कार्यालय सील.

Jagdish Pansare

Shivsena UBT News : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दालनातील एका लिपिकाने मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरच लाच स्वीकारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पस्तीस हजार रूपये लाच स्वीकारताना या लिपीकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या घटनेने राज्य सरकारची नाचक्की होत आहे.

राज्यातील विरोधी पक्ष या प्रकारानंतर सरकारवर तुटून पडले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी या लाचप्रकरणावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ज्या अन्न व औषध प्रशासन विभागावर राज्याच्या आरोग्याची जबाबदारी आहे, तिथेच इमान विकले जाते, हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याची टीका दानवे यांनी केली आहे.

ज्या FDA विभागावर राज्याच्या आरोग्याची जबाबदारी आहे, तिथेच 35 हजारांत 'इमान' विकले जातेय, हे महाराष्ट्राचे दुर्दैव! आरोपी मंत्र्यांच्या स्टाफशी संबंधित असणे आणि तपासात 'अप्पा शिंदे' यांचे नाव येणे, हे निव्वळ योगायोग असू शकत नाहीत. फाईल क्लिअरन्सच्या नावाखाली मंत्रालयात नक्की कशाचा बाजार मांडलाय? असा सवाल त्यांनी केला.

खालपासून वरपर्यंत सर्वांचे 'टेबल' ठरले आहेत का? एसीबीने आता फक्त फांद्या छाटू नयेत, तर बुंध्यावरच घाव घालावा, अशी मागणी करत त्यांनी राज्य सरकराच्या कारभारावर आसडू ओढले. एका परवाना नूतनीकरणाच्या कामासाठी मंत्री झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंग याने तक्रारदाराकडे 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यापैकी 35 हजार रुपये गुरुवारी स्वीकारण्याचे ठरले होते.

याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकाऱ्यांनी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर सापळा रचला. यानंतर त्यांनी राजेंद्र ढेरंग यांना पैसे स्वीकारताना ताब्यात घेतले. महाराष्ट्रचा कारभार हाकणाऱ्या मंत्रालयाच्या इमारतीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली. या कारवाईनंतर एसीबीने नरहरी झिरवाळ यांचे कार्यालय सील केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT