Mumbai News : विधानपरिषदेतील ठाकरे गटाचे आमदार आमशा पाडवी यांनी रविवारी शिंदे गटांत प्रवेश केला आहे. त्यामुळे विधानपरिषेदेतील ठाकरे गटाचे संख्याबळ एकने घट झाली आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना विधान परिषदेतील 21 आमदार जुलै महिन्यापर्यंत टप्याटप्याने येत्या तीन महिन्यांत निवृत्त होणार आहेत.
निवृत्त होणाऱ्या आमदारांमध्ये सर्वाधिक आठ जण भाजपचे आहेत तर त्यानंतर सहा जण शिवसेनेचे असून तीन शिंदे गटाचे तर तीन ठाकरे गटाच्या आमदारांचा समावेश आहे. त्यामुळे येत्या काळात संख्याबळ कमी होत असल्याने शिवसेना ठाकरे गटाचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच विरोधी पक्षनेते पद धोक्यात आले आहे.
शिवसेना ठाकरेंकडे सध्या 7 आमदारांच संख्याबळ असली तरी त्यामधील 3 आमदारांचा कार्यकाळ जुन आणि जुलैमध्ये संपणार आहे. तर दुसरीकडे सध्या काँग्रेसचे 8 आमदार आहेत. त्यापैकी 2 आमदारांचा कार्यकाळ येत्या जुलै महिन्यात संपत आहे. त्यामुळे अंबादास दानवे यांच विरोधी पक्षनेते पद धोक्यात आले असल्याची चर्चा आहे.
विधान परिषदेतील सध्याचे संख्याबळ पाहता शिवसेना ठाकरे गटाकडे 7 आमदार आहेत तर दुसरीकडे काँग्रेसकडे 8 अंडर आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे 3 आमदार आहेत. जुलै महिन्यानंतर विधान परिषदेतील 21 आमदार जुलै महिन्यापर्यंत टप्याटप्याने येत्या तीन महिन्यांत निवृत्त होणार आहेत. त्यामुळे आणखी संख्याबळ कमी होणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जुलै महिन्यानंतर विधान परिषदेत ठाकरे गटाकडे 4, काँग्रेसकडे 6 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे 3 आमदार राहणार आहेत. त्यामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद शिवसेना ठाकरे गटाकडून जाणार आहे. काँग्रेसकडे (congress) शिवसेनेपेक्षा (Shivsena) दोन आमदार जास्त असल्याने या पदावर येत्या काळात काँग्रेसकडून दावा केला जाण्याची शक्यता असल्याने अंबादास दानवे यांच विरोधी पक्षनेते पद धोक्यात आले असल्याची चर्चा आहे.