Ambadas Danve On Mahayuti Government  Sarkarnama
महाराष्ट्र

Mahayuti Government: उद्धव ठाकरेंच्या नेत्याचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप, 'Modi Birthday' च्या 10 योजना बंद, यादीही केली जाहीर

Uddhav Thackeray Shiv Sena : विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीत 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मोठी गेमचेंजर ठरली होती. या योजनेचा पुन्हा महायुतीला सत्तेत आणण्यात मोठा वाटा आहे. पण आता या गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणात भार पडत असल्यामुळे अनेक सरकारी योजनांना कात्री लावली जात असल्याचं बोललं जात आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News: विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीत 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मोठी गेमचेंजर ठरली होती. या योजनेचा पुन्हा महायुतीला सत्तेत आणण्यात मोठा वाटा आहे.पण आता या गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणात भार पडत असल्यामुळे अनेक सरकारी योजनांना कात्री लावली जात असल्याचं बोललं जात आहे. अशातच आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेना नेत्याच्या आरोपांनी खळबळ उडवून दिली आहे.

विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आक्रमक नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी फडणवीस सरकारबाबत धक्कादायक दावा केला आहे.त्यांनी'फडणवीस सरकारनं 'Modi Birthday' च्या 10 योजना बंद केल्याचा आरोप केला आहे.याचवेळी त्यांनी योजनांची यादीही दानवे यांनी जाहीर केली आहे.

अंबादास दानवे यांनी राज्यात 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सत्तेत आलेल्या महायुती सरकारच्या (Mahayuti Government) कार्यकाळात 17 सप्टेंबर 2023 रोजी सुरू केलेल्या 10 योजना सुरू केल्याचं म्हटलं आहे.पण फडणवीस सरकारच्या काळात या सर्व योजनाबंद करण्यात आल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी केला आहे.

नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान योजना, नमो दिव्यांग शक्ती योजना,नमो महिला सशक्तीकरण योजना, नमो कामगार कल्याण योजना, नमो शेततळा अभियान, नमो ग्राम सचिवालय योजना, नमो आदिवासी स्मार्ट शाळा योजना,नमो क्रीडा मैदान व उद्यान योजना, नमो शहर सौंदर्गीकरण योजना आणि नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संवर्धन या सर्व योजना आताच्या महायुतीसरकारनं बंद केल्याचा दावा शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

'सामना'तूनही हल्लाबोल

तसेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून योजनांना कात्री लावण्यात येत असल्याच्या आरोपांवरुन महायुती सरकारवर सडकून टीका करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्राच्या नशिबी गतिमान वगैरे नव्हे, तर ‘बंद’ आणि ‘मंद’ सरकार आले आहे! जनतेनेच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येऊ घातलेल्या निवडणुकीत या सरकारचा समाचार घ्यायला हवा', असा घणाघात करण्यात आला आहे.

याचवेळी 'सामना'तून ठाकरेंनी सरकारकडून ज्या योजना सुरू ठेवल्या जात आहेत,त्यांना सुधारित निकष आणि नवीन नियमांची आडकाठी घालून त्यांची गती‘मंद’केली जात असल्याचा आरोपही केला आहे. 'राज्य सरकार वेगवान कारभाराच्या कितीही फुशारक्या मारीत असले तरी प्रत्यक्षात नेमके त्याउलट सुरू आहे. नवीन योजना सोडा,त्यांनीच गाजावाजा केलेल्या योजना ही मंडळी एकेक करून बंद करीत आहे, अशी टीकाही ठाकरेंनी सामनातून सरकारवर केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT