Raj Thackeray sarkarnama
महाराष्ट्र

Raj Thackeray Post : राज ठाकरेंच्या एका 'म्हणी'ने उठणार राजकीय वादळ; अमित शाह मुंबईतून परतताच केलेले सूचक विधान चर्चेत

Raj Thackeray latest post after Amit Shah visit : अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर राज ठाकरे यांनी केलेली सूचक पोस्ट चर्चेत आली आहे. राज ठाकरे नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या.

Rashmi Mane

Raj Thackeray post on Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अमित शाह यांचा दौरा संपल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका सूचक पोस्टने राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे. राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमधून कोणाचेही थेट नाव घेतले नसले, तरी त्यांच्या विधानाचा नेमका रोख कोणाकडे आहे, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक छोटी मात्र लक्षवेधी पोस्ट केली. त्यामध्ये त्यांनी लिहिले, “कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते, तूर्तास एवढेच.” राज ठाकरे यांच्या या सूचक विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

विशेष म्हणजे अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा नुकताच पार पडला असून, त्यानंतरच राज ठाकरे यांची ही पोस्ट समोर आली आहे. त्यामुळे या पोस्टचा संबंध अमित शाह यांच्या दौऱ्याशी आणि भाजपच्या राजकीय भूमिकेशी जोडला जात आहे. मात्र, राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये कोणाचेही नाव घेतलेले नाही.

मनसे-भाजप समीकरणावर पुन्हा चर्चा

राज ठाकरे यांच्या या पोस्टमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप यांच्यातील संभाव्य राजकीय समीकरणाचाही मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना राज ठाकरे यांच्या या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते’ या म्हणीच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी टीकाकार किंवा विरोधकांना सूचक प्रत्युत्तर दिल्याची चर्चा आहे. कोणत्याही राजकीय दबावामुळे किंवा टीकेमुळे आपल्या भूमिकेवर परिणाम होणार नाही, असा संदेश त्यांनी या पोस्टमधून दिला आहे का, याबाबतही चर्चा रंगली आहे.

‘तूर्तास एवढेच’ म्हणत दिला संकेत?

राज ठाकरे यांनी पोस्टच्या शेवटी ‘तूर्तास एवढेच’ असे म्हटल्याने त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडेही लक्ष लागले आहे. ही पोस्ट केवळ प्रतिक्रिया आहे की त्यामागे आगामी राजकीय घडामोडींचा काही संकेत आहे, याबाबत आता तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा, त्यानंतर राज ठाकरे यांची सूचक पोस्ट आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय हालचाली यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. आता भाजप किंवा अन्य राजकीय नेत्यांकडून राज ठाकरे यांच्या या विधानावर काही प्रतिक्रिया येते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT