amitesh kumar  sarkarnama
महाराष्ट्र

Amol Mitkari News: पुणे पोलिसांवर अजितदादांचा आमदार चिडला, पोलिस आयुक्त अमितेश कुमारांना ओपन चॅलेंज, म्हणाले...

Amol Mitkari challenges Pune Police Commissioner amitesh kumar : अमोल मिटकरी यांनी अभिनेता राहुल सोलापूरकर याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, पोलिसांनी सोलापूरकर यांना दिलासा दिला.

Roshan More

Amol Mitkari News : छत्रपती शिवाजी महाराज आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांना पुणे पोलिसांनी क्लिन चिट दिली आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार, आणि पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना ओपन चॅलेंज दिले आहे.

ट्विट करत अमोल मिटकरी म्हणाले आहेत की, 'पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून औरंगजेबाच्या पत्नीला लाच देऊन निसटले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर रामजी संकपाळ यांना दत्तक गेले होते व ते कर्माने ब्राह्मण होते हे सिद्ध करावे आणि नंतर सोलापुरकर यांची पाठराखण करावी.'

अभिनेता राहूल सोलापूरकर याने एका मुलाखतीमध्ये शिवाजी महाराज हे आग्रहून सुटताना पेटाऱ्यामधून सुटले नाहीत तर त्यांनी औरंगजेबाच्या लोकांना तसेच त्याच्या पत्नीला लाच दिल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्या विरोधात महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येत होते.

राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी करण्यात येत होती. अमोल मिटकरी यांनी देखील राहुल सोलापूरकर वर कारवाई कधी? याचेवर अतितात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.., असे ट्विट केले होते. त्यांनी हे ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांना टॅग देखील केले होते.

आंदोलनाचे समर्थन

मिटकरी यांनी राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर होणाऱ्या आंदोलनाचे समर्थन देखील केले होते. त्यांनी ट्विट केले होते की, 'सोलापूरकर नावाच्या विकृत हैवानाने छत्रपती शिवरायांचा केलेला एकेरी उल्लेख व इतिहासाशी केलेला खोडसाळपणा याविरुद्ध पुण्यातील शिवभक्तांनी त्याच्या घराबाहेर केलेल्या आंदोलनाचं व भुमिकेचं मी जाहीर स्वागत व समर्थन करतो.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT