Nitesh Rane Nilesh Rane Amol mitkari sarkarnama
महाराष्ट्र

Amol Mitkari On Rane Brothers : राणे बंधुंमध्ये वादाची ठिणगी? अमोल मिटकरींनी घेतली फिरकी, करून दिली रामायणाची आठवण

Nitesh-Nilesh Rane Dispute : नितेश राणेंच्या त्यांचे मोठे बंधु, शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी त्यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला होता.

Roshan More

Amol Mitkari News : मंत्री नितेश राणे हे सातत्याने वादग्रस्त विधान करत आहेत. नुकतेच त्यांनी सगळ्यांचा बाप भाजपचा मुख्यमंत्री तिथे बसला आहे. हे लक्ष्यात ठेवावे. तसेच कोणी कितीही ताकद दाखवली, कोणीही कसेही नाचले तरी देशात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान आणि राज्यात देवेंद्र फडणवीस हेच खरे मुख्यमंत्री आहेत, असे म्हटले होते.

नितेश राणेंच्या या वक्तव्यानंतर त्यांचे मोठे बंधु, शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी त्यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला होता. निलेश यांनी ट्विटरवरून दिलेल्या सल्ल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी रिट्विट करत निलेशजी राणे तुम्ही टॅक्स फ्री आहात, असे म्हटले. त्यामुळे राणे बंधुंमध्ये वादाची ठिणगी पडल्याची चर्चा आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी रामायणाची आठवण करून देत नितेश राणेंना डिवचले आहे.

मिटकरी म्हणाले, नितेश राणे हे मंत्री आहेत. हिंदुधर्म रक्षक म्हणून त्यांचा चेहरा प्रसिद्ध आहे.हिंदु धर्मात आपण रामाला सर्वश्रेष्ठ मानतो. राम आणि भरत या भावांच नातं किती ग्रेट होतं, हा एक संस्कार या देशात रुजला आहे. भरत लहान होते राम मोठे होते.अनेकदा राम हे भरताला सल्ला द्यायचे मार्गदर्शन करायचे. मात्र, इथे थोडं वेगळं आहे.

'नितेश राणे लहान आहे आणि निलेश राणे हे त्यांचे मोठे बंधु आहेत. नितेश हे हिंदुरक्षक आहेत तर त्यांनी रामायणाचा एक भाग अंगीकारला पाहिजे. तो म्हणजे भावाने दिलेला सल्ला हा हिंदु धर्मामध्ये सर्वोच्च मानला जातो. त्यामुळे नितेश राणेंना निलेश राणेंनी जो काही सल्ला दिलाय की आपल्या बोलण्यात महायुती बिघाडी होणार नाही याची काळजी घ्यावी. तेवढाच सल्ला त्यांनी ऐकावा. बाकी त्यांना सल्ला देण्याइतपत मी मोठा नाही.' , असे मिटकरी म्हणाले आहेत.

निलेश राणेंनी ट्विट केले डिलिट

निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटले होते की, 'नितेश ने जपून बोलावे... मी भेटल्यावर बोलेननच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही.' हे ट्विट रिट्विट करत नितेश राणेंनी तुम्ही टॅक्स फ्री आहात, असे म्हटले होते. मात्र, आता निलेश राणे यांनी त्यांचे ट्विट डिलिट केल्याचे समोर आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT