Amravati hospital fire news Sarkarnama
महाराष्ट्र

Amravati Hospital Fire News : अग्निकांड प्रकरणाचा धक्कादायक अहवाल; कंपनीला वाचविण्यासाठी बड्या नेत्याचा दबाव? पाच अधिकारी निलंबित

District Women Hospital, Fire Report : अमरावती स्त्री रुग्णालयातील अग्निकांडात बोगस आरोग्य यंत्रणा, राजकीय दबाव व प्रशासकीय हलगर्जीपणाचे धक्कादायक तपशील; पाच अधिकारी निलंबित, वरिष्ठांवर कारवाईचा प्रश्न अनुत्तरित.

सरकारनामा ब्यूरो

Amravati Fire Incident update : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील अग्निकांडात तीन बालके दगावली होती. या घटनेच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे.

प्रशासकीय यंत्रणेतील अनेक जण या अग्निकांडाचे गुन्हेगार असल्याच्या धक्कादायक बाबी चौकशीत समोर आल्याचे समजते. आरोग्य यंत्रणेतील बोगस कारभार,राजकीय दबाव आणि हलगर्जीपणा यामुळे ही घटना घडल्याची माहिती सुत्रांनी दिली.

जिल्हा स्त्री रुग्णालयात २४ ऑगस्ट रोजी ही दुर्घटना घडली होती. याप्रकरणी आतापर्यंत पाच अधिकारी निलंबित करण्यात आले आहेत. त्यामध्ये आरोग्य उपसंचालक, सिव्हिल सर्जन, वैद्यकीय अधिक्षकांचा समावेश आहे.

आणखी काही जणांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. मात्र, व्हेंटिलेटर कंपनीसह आणखी काही जणांना वाचविण्यासाठी एका बड्या नेत्याचा दबाव असल्याचा आरोप होत आहे.

रुग्णालयाचे फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिट न करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम व विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. यावरून काँग्रेस नेते डॉ. सुनील देशमुख यांनी सरकारवर टीका केली आहे.

मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी व PWD च्या दोषींवर कारवाई न करता खालच्या कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच चौकशी अहवाल सार्वजनिक न केल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

कुणावर होतायेत आरोप?

जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक व निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे हा भोंगळ कारभार राजरोसपणे सुरू होता, असा आरोप होतोय.

वेळेत फायर ऑडिट न करणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे विद्युत विभागाचे अधिकारी, ऑडिट करून घेण्याची जबाबदारी असणारे अग्निशमन दलाचे अधिकारी, दर्जेदार उपकरण डावलून बोगस वॉर्मर आणि व्हेंटिलेटर खरेदी करणारे प्रशासकीय अधिकारी, पुरवठा कंत्राटदार आदींवर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.

नेत्याचा दबाव

ठराविक बोगस कंपनी कडून व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी एका बड्या राजकीय नेत्याचा दबाव असल्याचा धक्कादायक आरोपही होत आहे. हा नेता नेमका कोण, याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. त्याचप्रमाणे वॉर्मर आणि व्हेंटिलेटर च्या बल्बचे तापमान सातत्याने वाढत होते वैद्यकीय नियमानुसार दर तासाला त्याची नोंद घेणे व वॉर्मर चे तापमान नियंत्रित करणे आवश्यक होते. मात्र त्या रात्री कर्तव्यावर असणाऱ्या परिचारिकेची दुर्लक्ष झाल्याचा आरोपही होत आहे.

तपासणी नाही

रुग्णालयातील यंत्रसामुग्रीची नियमित तपासणी करणे, दुरूस्ती करण्याची जबाबदारी आय.पी.एम.एस.चे समन्वयक सुरजधार पवार यांच्या कडे होती. प्रत्यक्षात जाऊन तपासणी,पाहणी न करता कागदपत्रांवर सगळं काही व्यवस्थित असल्याचे दाखवून दुर्लक्ष केल्याचा आरोपही केला जात आहे. अहवालामध्ये या बाबी समोर आल्याची माहिती सुत्रांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT