Election for Angar Nagar Panchayat president post stayed; Rajan Patil faces setback after official order.  sarkarnama
महाराष्ट्र

Angar Nagarpanchayat Election : मोठी बातमी! अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित; राजन पाटलांना धक्का

Rajan Pati Angar Nagarpanchayat Election : निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी परिपत्रक काढत अनगर नगरपंचायत नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोधी झाली होती तिला स्थगिती दिली आहे

Roshan More

Angar News : राज्यभर गाजलेली सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचयातीची निवडणूक पुन्हा चर्चेत आली आहे. माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनबाई, भाजपच्या उमेदवार प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील या बिनविरोध नगराध्यक्ष झाल्या होत्या. मात्र, जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी एक परिपत्रक काढत सोलापूर जिल्ह्यातील पाच नगरपरिषदांमधील काही जागांसह अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित केली आहे.

कुमार आशीर्वाद यांनी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आणि निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नगरपालिका नियम 1966 च्या नियमाचे 17(1) (ब) नुसार कार्यवाही न झाल्याबद्दल खात्री केली आहे. त्यानुसार निवडणूक स्थगित करून राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारीत कार्यक्रमानुसार निवडणूक कार्यक्रम राबवण्यात येईल,

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांनी अजित पवारांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली अनगर नगरपंचायतीची निवडणूत बिनविरोध केली होती. सर्व नगरसेवक बिनविरोध निवडणूक आले होते. तर, नगराध्यक्षपदासाठी प्राजक्ता पाटील या भाजपकडून, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उज्वला थिटे आणि अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे या मैदानात होत्या.

सरस्वती शिंदे यांनी निवडणुकीतून माघात घेत भाजप उमेदवार प्राजक्ता यांना पाठींबा जाहीर केला होता. तर, उज्वला थिटे यांनी आपल्यावर दबाव टाकला जात आहे, धमकी दिली जात असून उमेदवारी अर्ज देखील भरू दिला जात नसल्याच्या आरोप केला होता. त्यामुळे ही निवडणूक राज्यभर गाजली होती. उज्वला यांनी पहाटे येऊन उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, त्यांच्या अर्जावर सूचकाचे नाव नसल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला आणि प्राजक्ता पाटील यांची नगराध्यक्षपदासाटी बिनविरोध निवड झाली होती.

'या' ठिकाणी निवडणुकीला स्थगिती

अनगर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसह मैंदर्गी नगरपरिषद प्रभाग क्र.सहा, सांगोला नगरपरिषद प्रभाग १ आणि प्रभाग क्रमांक ११, मोहोळ नगरपरिषद प्रभाग क्रमांक तीन अ, प्रभाग क्रमांक पाच ब, मंगळवेढा नगरपरिषद प्रभाग क्रमांक सहा अ, पंढरपूर नगरपरिषद प्रभाग क्रमांक सात ब या नगरसेवकपदाच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT