Anjali Damania retracts her statement on Sushma Andhare’s alleged NCP entry, calling it a mistake. Sarkarnama
महाराष्ट्र

Anjali Damania Vs Sushma Andhare : सुषमा अंधारेंना नडणाऱ्या अंजली दमानियांची माघार? म्हणाल्या, 'चूक माझी...'

Anjali Damania Steps Back on Sushma Andhare NCP Claim : दमानिया यांनी अंधारे यांना म्हटले की, प्रकाशझोतात ज्यांना यायचं असत ते वाट्टेल ते करतात. त्यासाठी एखाद्या पक्षाच्या अध्यक्षांबद्दल वाट्टेल ते बोलतात आणि मग त्याच पक्षात जाऊन नेत्या बनतात.

Roshan More

Anjali Damania News : सामाजिक कार्यकर्त्या यांनी सुषमा अंधारे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याची शक्यता वर्तवली होती. आपल्या ब्राॅडकास्टच्या मेसेजमध्ये त्यांनी अंधारे राष्ट्रवादीत जाणार हे प्रश्नचिन्ह असलेले वाक्य टाकले होते. त्यावर सुषमा अंधारे यांनी ट्विट करत अंजली दमानिया यांना सुनावले. त्यावरून दमानिया आणि अंधारे यांच्यात ट्विटर वाॅर देखील पाहण्यास मिळाले.

'बाई, आपण अशक्य मूर्ख प्रांतात आहेत. फुकट फौजदारकी तुमच्याजवळ राहू द्या. तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायला तुम्ही कुणी तीसमार खान नाहीत. तुम्ही कुणाच्या पे रोलवर काम करता हे आधी स्पष्ट करा. जमल्यास अमृता फडणवीसानी अनिक्षा जयसिंगानीच्या विरोधात का FIR का केली यावर अक्कल पाजळा..', असे ट्विट दमानियांना यांना उद्देशून अंधारे यांनी केले होते. त्यावर उत्तर देताना 'चूक माझी होती. ज्यांना भाषेचं आणि सभ्यतेचं ताळतंत्र नाही अशांबद्दल बोलण्याची घोड चूक मी केली.', असे दमानियांनी रिट्विट करत म्हटले.

'त्या' मेसेजवर खुलासा

दमानिया या प्रकाशझोतात राहण्यासाठी हे करत असल्याचे अंधारे यांनी म्हटले होते. त्याबाबत दमानिया यांनी म्हटले की, प्रकाशझोतात ज्यांना यायचं असत ते वाट्टेल ते करतात. त्यासाठी एखाद्या पक्षाच्या अध्यक्षांबद्दल वाट्टेल ते बोलतात आणि मग त्याच पक्षात जाऊन नेत्या बनतात, हे मला ह्या जन्मी जमणार नाही, असे म्हटले.

अंधारे या राष्ट्रवादी जाणार या आपल्या मेसेजबद्दल स्पष्टीकरण देताना दमानियांनी सांगितले की, एका चॅनलने बातमी ट्वीट केली की ठाकरे गटातील कोणीतरी अजित पवार गटात जाणार, ह्यावर मी फक्त माझ्या वैयक्तिक मीडिया ब्राॅडकास्टच्या व्हॉट्सअप ग्रुपवर लिहिलेला हा एक प्रश्न होता. तो तुम्हाला कोणीतरी पाठवला.

भाजप नेत्यांना साॅफ्ट काॅर्नर?

दमानिया या ठाकरे, पवार यांच्यावर आरोप करतात पण भाजप नेत्यांवर का नाही? असा प्रश्न अंधारे यांनी दमानियांना केला होता. त्यावर ठाकरे, पवार, फडणवीस, मुनगंटीवार, बावणकुळे, ह्या सगळ्यांना पाहून घेऊच पण अजित पवारांच्या घरी गेला होतात की नाही आणि पक्ष प्रवेश करणार होतात की नाही प्रश्नाचे उत्तर का बरं दिले नाहीत? असा प्रतिप्रश्न केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT