Pankaja Munde, Anjali Damania, Dhananjay Munde Sarkarnama
महाराष्ट्र

Dhananjay Munde Vs Pankaja Munde : पंकजा मुंडेंविरोधात फाईलचा ठोकळा आणला होता! दमानियांचा धनंजय मुंडेंबाबत मोठा गौप्यस्फोट

Anjali Damania Maharashtra Politics Dhananjay Munde News : अंजली दमानिया यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत राजेंद्र घनवट आणि पोपटलाल घनवट यांच्याबाबत अनेक गंभीर आरोप केले. याचवेळी त्यांनी धनंजय मुंडे आपल्याला भेटल्याचेही सांगितले.

Rajanand More

Mumbai News : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत मंगळवारी मोठा गौप्यस्फोट केला. चार ते पाच वर्षांपूर्वी मुंडे फाईलचा ठोकळा घेऊन आपल्याकडे आले होते. या फाईल पंकजा मुंडेविरोधातील असल्याचा दावा दमानिया यांनी पत्रकार परिषदेत केल्याने खळबळ उडाली आहे.

अंजली दमानिया यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत राजेंद्र घनवट आणि पोपटलाल घनवट यांच्याबाबत अनेक गंभीर आरोप केले. यावेळी सुरूवातीलाच त्यांनी धनंजय मुंडे आणि घनवट यांच्या जवळच्या संबंधांबाबतची माहिती दिली. त्यासाठी त्यांनी मुंडे आपल्याकडे घेऊन आलेल्या फाईलबाबत त्यांनी गौप्यस्फोट केला.

दमानिया म्हणाल्या, माझ्या घरी चार ते पाच वर्षांपूर्वी धनंजय मुंडे हे स्वत: एका तेजस ठक्कर नावाच्या व्यक्तीसोबत आले होते. अख्खा फाईलचा ठोकळा घेऊन ते आले होते. पंकजा मुंडेंविरोधातील त्या फाईल होत्या. त्या आधी ज्यांचा फोन आला, ते तेजस ठक्कर आणि राजेंद्र घनवट होते.

माझ्याकडे फाईल आल्यानंतर त्यांना मी व्यवस्थित समजावले की, दिलेल्या फाईलवर मी कधीही काम करत नाही. म्हणून पंकजा मुंडेंचा कोणताही विषय तेव्हा लावून धरला नाही, असा मोठा दावा दमानिया यांनी केला आहे. दमानिया यांच्या दाव्यामुळे बीडचे राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

धनंजय मुंडे यांच्याकडे पंकजा मुंडे यांच्याविरोधातील नेमक्या कोणत्या फाईल होत्या, फाईलमध्ये कोणते गुपित दडले आहे, धनंजय मुंडे दमानियांकडे का गेले, त्या फाईल आता कुठे आहेत, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाले आहेत. दमानिया यांनीही या फाईल्समध्ये नेमकी काय माहिती होती, याचा खुलासा केलेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT